अंधारीत गायीने दिला दोन वासरांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:03 IST2021-04-11T04:03:27+5:302021-04-11T04:03:27+5:30

अंधारी : सामान्यत: गाय एकावेळी एकाच वासराला जन्म देते. मात्र, सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील शेतकरी सिद्धेश्वर उत्तमराव मोहिते यांच्या ...

The dark cow gave birth to two calves | अंधारीत गायीने दिला दोन वासरांना जन्म

अंधारीत गायीने दिला दोन वासरांना जन्म

अंधारी : सामान्यत: गाय एकावेळी एकाच वासराला जन्म देते. मात्र, सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील शेतकरी सिद्धेश्वर उत्तमराव मोहिते यांच्या गायीने दोन वासरांना जन्म दिला आहे. ही दोन्ही वासरे पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

शेतकरी सिद्धेश्वर मोहिते यांच्या गायीने शनिवारी दोन वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे गाय व दोन्ही वासरांची प्रकृती ठणठणीत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर गोरे यांनी सांगितले. यावेळी डॉ. गोरे म्हणाले की, हजारो गायींमध्ये अशा घटना तुरळक घडतात. गायीला जुळे झाल्याने शेतकरी मोहिते मात्र जाम खुश आहेत. ही वार्ता गावात पसरल्यानंतर ग्रामस्थांनी गाय व वासरांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

फोटो : अंधारी येथील शेतकरी सिद्धेश्वर उत्तमराव मोहिते यांच्या गाईने दोन वासरांना जन्म दिला.

100421\rais shaikh_img-20210409-wa0093_1.jpg

अंधारी येथील शेतकरी सिद्धेश्वर उत्तमराव मोहिते यांच्या गाईने दोन पिल्लाला जन्म दिले.

Web Title: The dark cow gave birth to two calves