शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूरात धाडसी घरफोडी; सराफा व्यावसायिक पती-पत्नीला मारहाण, रोख रक्कमेसह सोने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:30 IST

नागरी वसाहतीत घडलेल्या धाडसी चोरीमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गंगापूर: ज्वेलर्स व्यावसायिकाच्या घरात घुसून चोरट्यांनी कोयत्याच्या धाकावर पती-पत्नीला महाराण करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन धाडसी चोरी केल्याची घटना सोमवारी (दि.४) रात्री साडेदहाच्या सुमारास वैजापूर मार्गावरील वर्धमान रेसिडेन्सी येथे घडली. भर नागरी वसाहतीत घडलेल्या धाडसी चोरीमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आनंदराव निवृत्ती पाटील हे गंगापूरमधील वर्धमान रेसीडेंसीमध्ये पत्नीसमवेत राहतात. त्यांचे शहरातील खंडोबा मंदिर परिसरात ज्वेलर्स दुकान आहे. सोमवारी रात्री ८ वाजता आपले दुकान बंद करून ते घरी आले. यानंतर १० वाजता पत्नीसमवेत जेवण करीत असताना तीन जण कोयता हातात घेऊन त्यांच्या घरात घुसले. दरवाजा आतून बंद करत चोरट्यांनी पती-पत्नीस दमदाटी केली. पाटील यांनी हिंमतीने दोघा चोरट्यांना झटापटीत पकडले. मात्र तिसऱ्या चोरट्याने कोयत्याने डोक्यावर वार करून पाटील यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर पाटील यांच्या पत्नीलाही मारहाण केली. पाटील पती पत्नीचे हातपाय बांधून चोरट्यांनी त्यांच्या तोंडात कपडा कोंबला.

बाहेरून कडी लावून झाले पसार...पाटील दाम्पत्याला बांधून ठेवल्यानंतर चोरट्यांनी घराची संपूर्ण झडती घेतली.  पाटील यांनी दुकानातून आणलेले रोख अडीच ते तीन लाख रुपये. पाटील यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरट्यांच्या हाती लागली. ते घेऊन चोरटे दरवाजाला बाहेरून कडी लावून पसार झाले.

शेजाऱ्यांच्या मदतीने सुटकापती-पत्नींनी एकमेकांचे हातपाय सोडून खिडकीतून बाहेर आवाज दिल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला. पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. शेजाऱ्यांनी गंभीर जखमी पाटील यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोनि कुमारसिंग राठोड यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भरनागरी वसाहतीत मारहाण करीत झालेल्या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी