प्रदेशाध्यक्षांनी मेळाव्यात महापौरांना काढला चिमटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:53 IST2017-10-06T00:53:28+5:302017-10-06T00:53:28+5:30
बापू, दिवस थोडे राहिले आहेत. डबल महापौर व्हायचयं तर नाही ना. मनपा कर्मचा-यांच्या हिताचे निर्णय घ्या, असा चिमटा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी महापौर भगवान घडमोडे यांना काढला

प्रदेशाध्यक्षांनी मेळाव्यात महापौरांना काढला चिमटा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बापू, दिवस थोडे राहिले आहेत. डबल महापौर व्हायचयं तर नाही ना. मनपा कर्मचा-यांच्या हिताचे निर्णय घ्या, असा चिमटा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी महापौर भगवान घडमोडे यांना काढला. या दिवसांत कर्मचा-यांच्या हिताचा असा निर्णय घ्या की तुम्ही पदावरून गेल्यानंतर आयुष्यभर ते तुमचे नाव घेतील, अशी पुष्टीही खा. दानवे यांनी जोडली.
भाजपप्रणीत बहुजन कामगार शक्ती महासंघातर्फे तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजित कामगारांच्या मेळाव्यात खा़ दानवे बोलत होते़ आ़ अतुल सावे, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, सभापती गजानन बारवाल, मनपा गटनेता प्रमोद राठोड, मनीषा भन्साळी, नगरसेवक राजगौरव वानखेडे, रामेश्वर भादवे, ज्ञानोबा मुंडे, पंजाबराव वडजे, बाळासाहेब गायकवाड, जालिंदर शेंडगे, अनिल भिंगारे,अध्यक्ष संजय रगडे, अशोक हिवराळे आदींची उपस्थिती होती. खा. दानवे म्हणाले, सबका साथ सबका विकास हे भाजपचे धोरण आहे, भाजप जातीयवादी असल्याचे भासविण्यात आल्याचे डोक्यातून काढून टाका. भाजपसोबत या, असे आवाहन खा़ दानवे यांनी केले़ केंद्र, राज्य आणि मनपात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.