दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे ठिकठिकाणी दहन
By Admin | Updated: May 12, 2017 00:23 IST2017-05-12T00:19:18+5:302017-05-12T00:23:30+5:30
उस्मानाबाद : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा गुरूवारी जिल्हाभरात निषेध नोंदविण्यात आला़

दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे ठिकठिकाणी दहन
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा गुरूवारी जिल्हाभरात निषेध नोंदविण्यात आला़ दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडा मारो आंदोलन करून पुतळ्याचे दहन करण्यात आले़
उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले़ यावेळी तालुकाप्रमुख दिलीप जावळे, पप्पू मुंडे, भीमा जाधव, कमलाकर दाणे, रामेश्वर शेटे, आनंद भक्ते, राजाभाऊ घोडके, गुणवंत देशमुख, आण्णासाहेब पवार, सौदागर जगताप, दादा कोळगे, पांडुरंग भोसले आदींची उपस्थिती होती. दरम्यान, तुळजापूर शहरात स्वाभिमारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले़ सदरील आंदोलनामध्ये संघटनेचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते़