जिल्ह्यात डेंग्यूचे थैमान..!
By Admin | Updated: September 5, 2016 00:45 IST2016-09-05T00:36:02+5:302016-09-05T00:45:49+5:30
कुंभार पिंपळगाव/तिर्थपुरी : जिल्ह्यात काही दिवसांपासून डेंग्युने थैमान घातले आहे. \

जिल्ह्यात डेंग्यूचे थैमान..!
कुंभार पिंपळगाव/तिर्थपुरी : जिल्ह्यात काही दिवसांपासून डेंग्युने थैमान घातले आहे. घनसावंगी तालुक्यातील अडगडे गव्हाण येथील ४० वर्षीय महिला तर वडीरामसगाव येथील चार वर्षीय चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. याबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येत असून, नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निर्मलाबाई गुजर (४० रा.आरगडे गव्हाण) व निकीता ज्ञानेश्वर चांदगुडे (४ वडीरामसगाव) असे डेंग्यूने मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
निर्मलाबाई यांना मंगळवारी ताप आल्याने त्यांना तात्काळ जालना येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल
केले.
उपचारादरम्यान रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, जावई असा परिवार आहे.
तसेच निकीताला सोमवारी ताप आला. औरंगाबाद येथे तिच्यावर उपचार करण्यात आले. परंतु शनिवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.