खाजगी रुग्णालयांकडून डेंग्यूच्या रुग्णांचा छळ
By Admin | Updated: August 13, 2014 01:40 IST2014-08-13T00:58:30+5:302014-08-13T01:40:46+5:30
वाळूज महानगर : डेंग्यूच्या आजाराची भीती दाखवून रुग्णांना दाखल करून घ्यायचे आणि नंतर पैसे नसल्याचे पाहून उपचाराअभावी रुग्णांचा छळ करायचा असे प्रकार खाजगी रुग्णालयात घडत आहे

खाजगी रुग्णालयांकडून डेंग्यूच्या रुग्णांचा छळ
वाळूज महानगर : डेंग्यूच्या आजाराची भीती दाखवून रुग्णांना दाखल करून घ्यायचे आणि नंतर पैसे नसल्याचे पाहून उपचाराअभावी रुग्णांचा छळ करायचा असे प्रकार खाजगी रुग्णालयात घडत असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे.
सचिन हनुमंत इनामदार (१७, रा. म्हाडा कॉलनी तीसगाव) हा वडिलांचे छत्र हरवल्याने भाजीपाला विकून आपल्या आईसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याची परिस्थिती बेताचीच. सचिनला ६ आॅगस्ट रोजी ताप आल्याने शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी डेंग्यू असल्याचे सांगून त्याला दाखल करून घेतले.
घाबरलेल्या आई व नातेवाईकांनी अखेर बजाजनगरातील एका खाजगी रुग्णालयात सचिनला दाखल केले. त्याच्यावर उपचार चालू असल्याची कहाणी सचिनची आई शिवकांता हनुमंत इनामदार यांनी सांगितली, तर सचिनची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. प्रशांत टेमक पाटील यांनी सांगितले.
नागरिकांनी डेंग्यूच्या आजाराला घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेत उपचार केल्यास डेंग्यूचा रुग्ण बरा होऊ शकतो, असेही डॉ. टेमक पाटील यांनी सांगितले.