अपहारप्रकरणी घोटाळेबाजांना दणका

By Admin | Updated: March 26, 2015 00:57 IST2015-03-26T00:38:01+5:302015-03-26T00:57:54+5:30

बीड : केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील राष्ट्रीय पेयजल अंर्तगत झालेल्या अर्धवट कामासाठी जुने साहित्य वापरुन ४२ लाख रुपये खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते

Dangers to the scandal | अपहारप्रकरणी घोटाळेबाजांना दणका

अपहारप्रकरणी घोटाळेबाजांना दणका


बीड : केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील राष्ट्रीय पेयजल अंर्तगत झालेल्या अर्धवट कामासाठी जुने साहित्य वापरुन ४२ लाख रुपये खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते. या प्रकरणी कसुन चौकशी लागली असून या प्रकरणी एक ग्रामरोजगार सेवक बडतर्फ करण्यात आला आहे. तसेच ग्रामरोजगार सेवकास निलंबीत केले आहे तर तांत्रिक अधिकाऱ्यावर आपल्यास्तरावरुन करण्याच्या सुचना जि.प. सीईओने दिल्या आहेत. मजुरांना पैसे वाटप करणाऱ्या पोस्ट मास्तरवर आपल्या स्तरावर कारवाई करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
केज तालुक्यातील पेयजल कार्यक्रम योजनेला २०११ मध्ये मंजुरी मिळाली होती. पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने आता पर्यंत ४२ लाख ९४ हजार २५६ रुपयांची एमबी रेकॉर्ड केली होती. या योजनेर्तंगत गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी उद्भव विहिर, पाईप लाईन व इत्यादी कामे केले असल्याचे २०१३-१४ या वर्षात झालेल्या कामाची एमबी दहिफळ वडमाऊली गावच्या समितीने जि.प. पाणी पुरवठा समितीला सादर केला होता.
सदरील योजनेच्या कामात जुने साहित्य वापरुन पैशाचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप दत्तात्रय येडू व ग्रामस्थांनी करत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केला होता. या प्रकरणी कसुन चौकशी सुरु आहे. सदरील कामात पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी रोटे हे दोषी अढळुन आले आहेत. त्यांच्यावर आपल्या स्तरावरुन कारवाई करण्याच्या सूचना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Dangers to the scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.