नद्यांमधील अतिक्रमणांमुळे पुराचा धोका
By Admin | Updated: January 15, 2016 00:18 IST2016-01-14T23:53:26+5:302016-01-15T00:18:40+5:30
जालना : जालना शहरातून वाहणाऱ्या सीना व कुंडलिका या दोन्ही नद्यांच्या काठांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.

नद्यांमधील अतिक्रमणांमुळे पुराचा धोका
जालना : जालना शहरातून वाहणाऱ्या सीना व कुंडलिका या दोन्ही नद्यांच्या काठांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सोबचत पुराचा धोका वाढण्याची भीती असल्याचे मत वाचकांनी सर्व्हेक्षणातून नोंदविले.
नद्यांमधील अतिक्रमणाबाबत लोकमतने प्रश्नावली माध्यमातून सर्व्हेक्षण केले. यात वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. या वाचकांना नद्यांमधील अतिक्रमणाबाबत पाच प्रश्न विचारण्यात आले. यात होय, नाही, माहीत नाही या स्वरूपात उत्तरे द्यावयाची होती.
यात प्रामुख्याने नद्यांमधील अतिक्रमणांमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे का? या प्रश्नावर ७० टक्के वाचकांनी होय उत्तर दिले. १० टक्के नाही तर २० टक्के वाचकांना याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. एकूणच तब्बल ७० नागरिकांना या अतिक्रमणाचे परिणाम स्पष्ट दिसतात. नद्यांमधील अतिक्रमणाकडे पालिकेसोबतच प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे? यावर ८० वाचकांनी पालिका तसेच प्रशासनावर खापर फोडून होय असे उत्तर दिले. पाच टक्के वाचकांना प्रशासनाचा दोष वाटत नाही तर १५ टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. अतिक्रमणामुळे पुराचा धोका वाढतो का? या प्रश्नावर ६५ टक्के नागरिकांना वाटते धोका वाढतो. १० टक्के म्हणतात नाही तर ५ टक्के वाचकांना माहीत नाही. नद्यांमधील अतिक्रमाणास राजकीय वरदहस्त आहे का? या प्रश्नावर ४० टक्के वाचक होय म्हणतात. २० टक्के नाही म्हणतात. तर तब्बल ४० टक्के वाचकांनी नाही म्हणून या प्रश्नावर बोलणे टाळले. नद्यांमधील अतिक्रमणाबाबत पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घ्यावा, असे वाटते का? या प्रश्नावर ७० टक्के वाचक होय म्हणतात.२० टक्के वाचकांचे नाही असे उत्तर आले तर १० टक्के वाचकांना याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. या प्रश्नांसोबतच नागरिकांनी अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी नदीक्षेत्रात जाऊ नये असे सुचविले. काही नागरिक मुद्दाहून येथे अतिक्रमण करतात. यामुळे पालिका अथवा इतर प्रशासनही काही करू शकत नाही. नदी प्रवाह व पर्यावरण पाहता नदीपात्रात झालेले अतिक्रमण नागरिकांनी स्वत:हून काढले पाहिजे अशी प्रतिक्रियाही वाचकांनी या सर्व्हे दरम्यान दिली. (प्रतिनिधी)
जालना शहरातून वाहणाऱ्या सिना व कुंडलिका नदीपात्रातील दोन्ही बाजूस तसेच पात्रातही काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी मोठे पथक घेऊन अतिक्रमणा पाहणी केली. नकाशा तसेच अतिक्रमणाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, सहा महिने उलटल्यानंतरही अतिक्रमण जैसे थेच आहे. नद्यांमधील अतिक्रमण आहे तसेच आहे. जिल्हाधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
नद्यांमधील अतिक्रमणे काढण्यासाठी नगर पालिकेने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे सीना व कुंडलिका नद्यांमध्ये कच्च्या सोबतच पक्के बांधकाम होत आहेत. काही ठिकाणी पक्की घरेसुद्धा बांधण्यात आलेली आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनीही या अतिक्रमणाचा अहवाल सादर केल्यानंतरही नद्यांमधील अतिक्रमण जैसे थेच आहेत.