जीवघेणा ‘शॉर्टकट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:27 IST2017-07-28T00:27:58+5:302017-07-28T00:27:58+5:30
बीड : शहरातील अपवादात्मक रस्ते सोडले तर सर्वच रस्ते अरूंद आहेत. सर्वत्र अतिक्रमणे आणि छोट्या-मोठ्या गाड्यावाल्यांनी बस्तान मांडले आहे.

जीवघेणा ‘शॉर्टकट’!
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील अपवादात्मक रस्ते सोडले तर सर्वच रस्ते अरूंद आहेत. सर्वत्र अतिक्रमणे आणि छोट्या-मोठ्या गाड्यावाल्यांनी बस्तान मांडले आहे. याचा परिणाम विस्कळीत वाहतूक होण्यास कारणीभूत ठरत आहे. हाच धागा पकडून गुरूवारी लोकमतने शहरातील मुख्य रस्त्यांची पाहणी केली असता केवळ ३० टक्केच लोक वाहतूक नियमांचे पालन करीत असल्याचे दिसले. ७० टक्के वाहनधारक, पादचारी मात्र वाहतूक नियमांबद्दल अनभिज्ञ असल्याचे पहावयास मिळाले.
बीड शहराून जाणाºया सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावर काही वर्षांपूर्वी दुभाजक उभारण्यात आले आहेत. त्यात झाडेही लावले. त्यामुळे रस्ता सुशोभित होण्याबरोबरच वाहतूकीला वळण लागले. परंतु पादचारी याला जुमानत नाहीत. दुरवरून वळण घालून येण्यापेक्षा या दुभाजकावरूनच उडी मारून रस्ता ओलांडताना दिसत आहेत. रस्ता ओलांडण्याच्या घाईने आतापर्यंत अनेक छोटे अपघात घडलेले आहेत. त्यातच राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथून अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अशा वर्दळीतून मार्ग काढताना अपघाताची दाट शक्यता आहे.