वालसावंगी परिसरात बिबट्याची दहशत!

By Admin | Updated: December 23, 2016 00:19 IST2016-12-23T00:15:45+5:302016-12-23T00:19:17+5:30

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परीसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांची भीती आहे.

Dangerous scare in Walsawangi! | वालसावंगी परिसरात बिबट्याची दहशत!

वालसावंगी परिसरात बिबट्याची दहशत!

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परीसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांची भीती आहे. रात्री अपरात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी जाणे बंद केले आहे.
येथील शेतकरी अनिल वाघ यांच्या शेतवस्तीवरील कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला.
यामुळे शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जाणे बंद केले आहे. वनविभागाचे वनरक्षक शिनगारे यांनी पाहणी केली असता सदर वन्यप्राणी बिबटयाची लक्षणे नाही कारण बिबटया हा कुत्र्याला खात नाही तर तरस हा प्राणी कुत्र्याची शिकार करतो असे उत्तर दिले. शेतकरयानी घाबरुन जाऊ नये कारण पद्मावती धरण असल्याने बिबट्या पाण्यातून जाऊ शकत नाही तरस हा वण्यप्राणी पाण्यातून जातो यामुळे सदर वण्यप्राणी बिबट्या नसून तरस असावा असा अंदाज व्यक्त केला. एकूणच बिबट्या अथवा तरस यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Dangerous scare in Walsawangi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.