छत्रपती संभाजीनगर : नायलॉन मांजा मुळे पाच दिवसांपुर्वी दोन तरुण जखमी झाले असताना आणखी एक बँक अधिकारी व एक पक्षी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. यातील बँक अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
बँकेत सेल्स अधिकारी असलेले सतिश वराडे (२४, रा. समर्थनगर) हे ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता दुचाकीने आकाशवाणीकडून सेंट्रलनाका मार्गे टी.व्ही. सेंटरच्या दिशेने जात होते. आझाद चौकात अचानक त्यांना त्यांच्या गळ्याला जखम झाल्याचे जाणवले. त्यांनी गळ्याला हात लावताच त्यांच्या हाताला मांजा लागला. त्यांनी दुचाकी थांबवून तो पकडून ठेवला. त्यामुळे हाताच्या बोटांनाही गंभीर इजा झाली. भावाला बोलावून त्यांनी तत्काळ खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले.
पक्षी देखील जखमीरोपळेकर चौकात तुटून पडलेल्या पतंगाच्या नायलॉन मांजात अडकून एक कबुतर जखमी झाले. मंगळवारी दुपारी १ वाजता जवाहरनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवीकुमार गाडेकर व अंमलदार मारोती गोरे गस्तीवर होते. त्याच वेळी रोपळेकर चौकात एका फळ विक्रेत्याजवळ कबुतर तडफडताना दिसले. त्यांनी तत्काळ तेथे जात त्याला पकडून त्याच्या पंखात अडकलेला मांजा काढून त्याचा जीव वाचवला.
Web Summary : Nylon Manja injures bank officer and pigeon in Sambhajinagar. A bank officer was injured by Manja, prompting a police complaint. Police rescued a pigeon entangled in the deadly thread near Roplekar Chowk, saving its life.
Web Summary : संभाजीनगर में नायलॉन मांजा से बैंक अधिकारी और कबूतर घायल। एक बैंक अधिकारी मांजा से घायल हो गया, जिसके बाद पुलिस में शिकायत दर्ज कराई गई। पुलिस ने रोपलेकर चौक के पास घातक धागे में फंसे एक कबूतर को बचाया, जिससे उसकी जान बच गई।