औद्योगिक वसाहतीत धोकादायक प्रवाहित तारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:28+5:302021-02-05T04:16:28+5:30
औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्यावरील पथदिव्यांच्या सगळ्या११ केव्ही क्षमतेच्या केबल उघड्या अवस्थेत असल्याने अपघाताची भीती वाढली आहे. विजेचा वापर करताना ...

औद्योगिक वसाहतीत धोकादायक प्रवाहित तारा
औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्यावरील पथदिव्यांच्या सगळ्या११ केव्ही क्षमतेच्या केबल उघड्या अवस्थेत असल्याने अपघाताची भीती वाढली आहे. विजेचा वापर करताना योग्य ती काळजी घ्या आणि अपघात टाळा, असा नेहमी संदेश देणाऱ्या महावितरणचा सावळागोंधळ समोर आला आहे. कारण रस्त्यावर जागोजागी उघड्या वायर, लटकणाऱ्या केबल्स, उघडे व तुटलेले स्विच बोर्ड, फुटलेले फ्यूज, उघड्यावर अंथरलेल्या हेवी इलेक्ट्रिक केबल्स, थेट खांबालाच गुंडाळलेल्या केबल हे जागोजागी धोक्याची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाही.
औद्योगिक वसाहतीला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने पथदिव्यांची सोय केली असली तरी आवश्यक ती सुरक्षितता पाहायला मिळत नाही. अंडरग्राऊंड असणारी केबल व्यवस्था उघड्यावर आली असून, प्रती तीन ते चार खांबांनंतर हे दुर्लक्षित चित्र पाहायला मिळत आहे. विद्युत यंत्रणा देखभाल व दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
आम्ही फॉल्ट रिपेअरिंगचे काम हाती घेतलेले आहे. शक्य तेवढे लवकर काम पूर्ण करू, असे ठेकेदाराने सांगितले.