धोकादायक इमारती उतरविण्याचे आदेश

By Admin | Updated: June 23, 2014 00:26 IST2014-06-22T22:44:33+5:302014-06-23T00:26:27+5:30

जालना : शहरातील सर्व धोकादायक इमारती किंवा भिंती तात्काळ उताराव्यात अन्यथा पालिका प्रशासन कायदेशीर कारवाई सुरू करेल, असा इशारा मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी दिला.

Dangerous Buildings Order | धोकादायक इमारती उतरविण्याचे आदेश

धोकादायक इमारती उतरविण्याचे आदेश

जालना : शहरातील सर्व धोकादायक व जीर्ण असणाऱ्या इमारती किंवा भिंती मालमत्ताधारकांनी तात्काळ उताराव्यात अन्यथा पालिका प्रशासन कायदेशीर कारवाई सुरू करेल, असा इशारा मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी दिला.
शहरात जवळपास ४३ हजार मालमत्ता आहेत. यापैकी शेकडो मालमत्ता जीर्ण अवस्थेत आहेत. त्या धोकादायक भिंती व इमारती कधीही कोसळतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर संबंधित मालमत्ताधारकांनी जीर्ण आणि धोकादायक असणाऱ्या इमारती किंवा भिंती तात्काळ उतरवून घ्याव्यात, असे मनोहरे यांनी म्हटले आहे. स्वच्छता निरीक्षकांमार्फत शहरातील अशा धोकादायक भिंती व इमारतींचा सर्वे केला जात आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Dangerous Buildings Order