शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

घाटी रुग्णालयात बनावट नियुक्तीचा धोका; फलकांद्वारे सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:55 IST

३१५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, प्रशासन सावध

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी लावतो म्हणून कोणी जर पैशांची मागणी करीत असेल तर वेळीच सावध झालेले बरे. यातून फसवणूक अथवा बनावट नियुक्तीपत्र देण्याचा प्रकार होऊ शकतो. घाटी रुग्णालयाच्या नावाखाली पूर्वी झालेल्या फसवणुकीच्या घटनांचा अनुभव घेऊन रुग्णालय प्रशासनाने जागोजागी नागरिकांना सतर्क करणारे फलक लावले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला. ३१५ चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदांसह विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ही संधी साधून काही जणांकडून उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीचा उद्योग होऊ शकतो. त्यामुळे यासंदर्भात घाटी रुग्णालय प्रशासनाने सर्वसामान्यांसाठी रुग्णालय परिसर आणि महाविद्यालय परिसरात फलक लावले आहेत.

कोणताही व्यवहार करू नयेनोकर भरती संदर्भात रुग्णालयातील कोणाशीही संपर्क साधू नये. कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नये. केल्यास, त्यास ते स्वत: जबाबदार राहतील. भरती प्रक्रिया ही टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस यांच्याकडून राबविण्यात येत आहे.- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, प्रभारी अधिष्ठाता

यापूर्वी फसवणुकीचे झालेले प्रकारऑक्टोबर २०१७ मध्ये ‘घाटीत कामाला लावतो’ म्हणून प्रत्येकी २ लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन १२ जणांना फसविल्याचा प्रकार समोर आला होता. १२ जणांना लाखोंना गंडा घालणाऱ्या आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर गतवर्षी जुलै २०२४ मध्ये घाटी येथे नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ९ जणांकडून ५६ लाख ६५ हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्यास बेगमपुरा पोलिसांनी अटक केली होती. 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी