प्लाटफॉर्मअभावी जीव धोक्यात

By Admin | Updated: September 29, 2014 00:38 IST2014-09-29T00:09:55+5:302014-09-29T00:38:00+5:30

पारडगाव : मनमाड ते नांदेड लोहमार्गावर पारडगाव (ता. घनसावंगी) हे रेल्वेस्थानक आहे. मात्र ते असून नसल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. या रेल्वेस्थानकावर पुर्णा मार्गे येणाऱ्या जाणाऱ्या

The danger of life threatening platform | प्लाटफॉर्मअभावी जीव धोक्यात

प्लाटफॉर्मअभावी जीव धोक्यात


पारडगाव : मनमाड ते नांदेड लोहमार्गावर पारडगाव (ता. घनसावंगी) हे रेल्वेस्थानक आहे. मात्र ते असून नसल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. या रेल्वेस्थानकावर पुर्णा मार्गे येणाऱ्या जाणाऱ्या पॅसेंजर गाड्यांना थांबा आहे. काही प्रवासी रात्री अपरात्री या थांब्यावर उतरतात. परंतु उतरताना येथे फलाटांची उंची नसल्यामुळे प्रवाशांचे पाय मोडल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
पावसाळ्यामध्ये रेल्वे स्थानकातील खोलीतही गळती होत असले तरी रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पत्रे टाकण्याची मागणी वेळोवेळी केल्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी नवीन टीनपत्रांचा शेड उभारण्यात आला.
मात्र प्रवाशांसाठी रेल्वेमध्ये चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी आवश्यक त्या उंचीवर फलाट नसल्याने रेल्वेतून खाली उतरतांना अनेक वेळा प्रवाशांच्या पायास दुखापत होते. वयोवृद्ध व्यक्तींना फलाटवर मोठी कसरत करावी लागत आहे. या सह या स्टेशनवर प्रवाशांना बसण्यासाठीही व्यवस्था नाही. औरंगाबाद, जालना, मनमाड, परभणी, नांदेड, हैदराबाद, सेलू, मानवत या मार्गावरील रेल्वे मार्गावरील प्रवाशांना येथे आल्यावर स्टेशनची दुरवस्था पाहून तीव्र नाराजी होत आहे.
संबंधित रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ तसेच रेल्वे प्रवाशांतून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The danger of life threatening platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.