वाकडी तलाव फुटण्याचा धोका टळला
By Admin | Updated: September 10, 2014 00:46 IST2014-09-10T00:27:04+5:302014-09-10T00:46:26+5:30
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे झालेल्या जोरदार पावसामुळे वाकडी तलाव फुटण्याच्या मार्गावर होता. मात्र ही बाब ग्रामस्थांनी तातडीने लक्षात आणून दिल्याने

वाकडी तलाव फुटण्याचा धोका टळला
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे झालेल्या जोरदार पावसामुळे वाकडी तलाव फुटण्याच्या मार्गावर होता. मात्र ही बाब ग्रामस्थांनी तातडीने लक्षात आणून दिल्याने व तहसीलदारांनीही प्रत्यक्ष भेट देऊन सांडव्यातून पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर हा धोका टळला.
रविवारी सायंकाळनंतर या भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे वाकडी तलाव ओव्हरफ्लो झाला. ग्रा.पं. सदस्य रामकृष्ण सूसर, गजानन वाघ, मुदस्सीर पठाण, गजानन सिरसाठ, सिराम आदींनी या प्रकराची माहिती तहसीलदार रुपा चित्रक, तलाठी अभय देशपांडे व ग्रामसेवक सपकाळ यांना दिली. लघुपाठबंधारेच्या अभियंत्यांनीही तेथे धाव घेतली.
या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. तहसीलदारांच्या आदेशानंतर सांडव्यातून पाणी सोडण्यात आल्याने तलाव फुटण्याचा धोका टळला. दरम्यान, ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे धोका टळला. (वार्ताहर)