शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईला दांडियाचे वेध! युवतींमध्ये यंदा पुष्पा अन् झमकुडी घागऱ्यांचा ट्रेण्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 19:51 IST

गुजरातहून तीन हजार नवीन घागरे शहरात दाखल

छत्रपती संभाजीनगर : देवीची आराधना करण्याचा काळ म्हणजे नवरात्रोत्सव होय. तरुणाईला वेध लागले ते रंगीलो दांडिया उत्सवाचे. यासाठी खास परिधान केले जाणारे नवीन घागऱ्यात यंदा ‘पुष्पा’ व ‘झमकुडी’ घागऱ्याचा ट्रेण्ड असून, युवतींमध्ये त्याची क्रेझ आहे.

गुजरातहून तीन हजार नवीन घागरे शहरात दाखलगुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, राजकोट येथून नवीन तीन हजार घागरे शहरात दाखल झाले आहेत. हे घागरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय भाड्याने घागरे घेण्याची परंपरा कायम असून, यासाठी सात हजार घागरे आधीचे आहेच.

१२ मीटर घेर असलेला पुष्पा घागराबाजारात आलेल्या पुष्पा घागराचे वैशिष्ट्य असे आहे की, याचा घेर १२ मीटरचा आहे. यास हाफ-हाफ घागरा असेही म्हणतात. कारण, यात घागऱ्याची अर्धी बाजू डिझाईनर तर अर्धी बाजू प्लेन असते.

आडव्या कळीचा झमकुडी घागरा‘झमकुडी’ घागऱ्याचा घेर ७ मीटर असतो. घागरा, सिव्हलेस ब्लाउज त्यावर फुल सिव्हलेस जॉकेट असते. कॉटन कपड्यावर वर्क केलेले असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे इतर घागरे उभ्या कळीचे असतात, तर झमकुडी घागऱ्याला आडव्या कळी असतात.

पाँचो कफतान घागराज्या महिला, तरुणी लठ्ठ आहे. त्यांच्यासाठी ‘पाँचो कफतान’ घागरा आला आहे. प्लेन घागरा, खाली बॉडर (आजरग, पटोला प्रिंटची बॉडर) असलेला घागरा शोभून दिसतो. या घागऱ्यात लठ्ठपणा दिसून येत नाही.

शेवटच्या चार दिवसात दररोज दीड हजार घागरे जातात भाड्यानेनवरात्रोत्सात सुरुवातीचे पाच दिवस शहरात २०० ते २५० घागरे भाड्याने जातात, तर शेवटचे चार दिवस हजार ते दीड हजारपेक्षा अधिक घागरे भाड्याने जातात. भाड्याने देण्यात येणारे घागरे त्यांची किंमत दोन हजार ते सात हजार रुपयांदरम्यान असते. हे घागरे डिझाइनर असतात. हे घागरे ५०० ते २ हजार रुपये भाड्याने मिळतात.- योगेश मालाणी, व्यापारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNavratriनवरात्री