‘फिल्ड वर्क’च्या नावाने दांड्या

By Admin | Updated: December 3, 2015 00:37 IST2015-12-02T23:53:08+5:302015-12-03T00:37:48+5:30

बीड : बीड नगर परीषदेतील अधिकारी, कर्मचारी ‘फिल्ड वर्क’च्या नावाखाली कार्यालयाला दांडी मारत असल्याचे समोर आले आहे. येथील बायोमेट्रीक मशीनही

Dandiya in the name of 'field work' | ‘फिल्ड वर्क’च्या नावाने दांड्या

‘फिल्ड वर्क’च्या नावाने दांड्या


बीड : बीड नगर परीषदेतील अधिकारी, कर्मचारी ‘फिल्ड वर्क’च्या नावाखाली कार्यालयाला दांडी मारत असल्याचे समोर आले आहे. येथील बायोमेट्रीक मशीनही या दांडीबहाद्दरांनी बंद पाडल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. अशा दांडीबहाद्दरांना आळा घालण्यासाठी ‘रॅटीना इम्प्रेशन’ (डोळ्याचा पडदा) बायोमेट्रीक मशीन बसविण्याची संकल्पना मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी पालीका प्रशासनापुढे व्यक्त केली आहे.
येथील नगर पालिकेत सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे आगोदरच मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे एका अधिकारी, कर्मचाऱ्याकडे दोन विभागाचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. त्यामुळे कामाच ताण वाढला आहे. परंतु याचे गांभीर्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना नसून कार्यालयात वेळेवर येण्यास त्यांची उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध कामे घेऊन आलेल्या नागरीकांना या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची वाट पहावी लागते. ‘फिल्ड’वर जाण्याचा बहाणा करून दांडी मारण्याचे प्रमाण वाढले आहे. लिपीकांना कोणत्या फिल्डवर जावे लागते, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. उशीरा कार्यालयात आल्याने बुधवारी वसुली विभागातील अशोक काळे व भारत गायकवाड या दोन निरीक्षकांची गैरहजेरी टाकल्याचे मुख्याधिकारी भालसिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Dandiya in the name of 'field work'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.