दांडियाच्या तालावर थिरकतेय तरुणाई

By Admin | Updated: October 8, 2016 01:12 IST2016-10-08T01:04:17+5:302016-10-08T01:12:33+5:30

औरंगाबाद : सध्या सगळीकडे मोठ्या धूमधडाक्यात नवरात्रीचा जल्लोष सुरू आहे. या वातावरणाला दांडियाप्रेमी आणखी उत्साहवर्धक करीत आहेत.

Dandiya lock on the junking | दांडियाच्या तालावर थिरकतेय तरुणाई

दांडियाच्या तालावर थिरकतेय तरुणाई


औरंगाबाद : सध्या सगळीकडे मोठ्या धूमधडाक्यात नवरात्रीचा जल्लोष सुरू आहे. या वातावरणाला दांडियाप्रेमी आणखी उत्साहवर्धक करीत आहेत. आकर्षक रोषणाई, कर्णमधुर गाणी आणि दांडिया खेळण्यास भाग पाडणारे संगीत, असे प्रोझोन येथे दिसून येणारे वातावरण आबालवृद्धांना साद घालत आहे. ‘लोकमत’च्या सहकार्याने व संदीप साऊंडस्, प्रोझोन व लायन्स क्लब औरंगाबाद रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य स्वरराज रास दांडिया प्रोझोन येथे तरुणाईच्या प्रचंड प्रतिसादात सुरू आहे.
पारंपरिक वस्त्रालंकार परिधान करून दांडियापे्रमी या उत्सवाचा मनापासून आनंद लुटत आहेत. खेळणाऱ्यांसोबत प्रेक्षकांचीही येथे विशेष उपस्थिती दिसून येत आहे. कार्यक्रमात आरतीला एशियन फेडरेशनचे सचिव संजय मोरे, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई, आरएसपीएल ग्रुपचे प्रदीप वाडेकर व सिद्धार्थ मोरे यांची उपस्थिती होती. यावेळी परीक्षक म्हणून अल्पना बांगड, मोहिनी बेडेकर यांंनी काम पाहिले.

Web Title: Dandiya lock on the junking