श्री संत साधू महाराज संस्थानची पायी दिंडी

By Admin | Updated: June 27, 2014 00:12 IST2014-06-26T23:24:33+5:302014-06-27T00:12:15+5:30

लातूर : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कंधार येथील श्री संत साधु महाराज संस्थानच्या वतीने कंधार ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा काढण्यात आली

Dandi of Shri Satyagra Maharaj Institute | श्री संत साधू महाराज संस्थानची पायी दिंडी

श्री संत साधू महाराज संस्थानची पायी दिंडी

लातूर : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कंधार येथील श्री संत साधु महाराज संस्थानच्या वतीने कंधार ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा काढण्यात आली असून, या दिंडीचे गुरुवारी लातुरात आगमन झाले़
कंधार येथील श्री संत साधु महाराज संस्थानच्या वतीने कंधार ते पंढरपूर पायी दिंडी गेल्या ७५ वर्षांपासून काढली जाते़ त्याच धर्तीवर याही वर्षी २० जून रोजी या यात्रेचे कंधार येथून प्रस्थान झाले़ ही दिंडी कंधार, लोहा, माळेगाव, अहमदपूर, चापोली, घरणी मार्गे गुरुवारी लातुरात दाखल झाली असून, पताका, टाळ, मृदंगाच्या जयघोषात दिंडी मुरुड मार्गे मार्गस्थ झाली़
सदरील दिंडी तडवळे रामलिंग, घारी, बार्शी, कुर्डवाडी, आरण, आष्टी मार्गे आषाढीच्या मुहूर्तावर पंढरपूरला रवाना होणार आहे़ या दिंडीमध्य लहान-थोर असे साडेपाचशे भाविक सहभागी झाले असून, त्यांच्या निवास व भोजनाची सोयही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आल्याचे भाविकांनी सांगितले़

Web Title: Dandi of Shri Satyagra Maharaj Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.