प्रत्येक पोलिस ठाण्यात दामिनी पथक स्थापन करणार

By Admin | Updated: December 8, 2015 00:03 IST2015-12-07T23:45:51+5:302015-12-08T00:03:22+5:30

भोकरदन : महिला सुरक्षा व महाविद्यालयीन परिसरात होणाऱ्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात दामिनी पथकाची स्थापना करण्यात येणार

Damini squad will be established in every police station | प्रत्येक पोलिस ठाण्यात दामिनी पथक स्थापन करणार

प्रत्येक पोलिस ठाण्यात दामिनी पथक स्थापन करणार


भोकरदन : महिला सुरक्षा व महाविद्यालयीन परिसरात होणाऱ्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात दामिनी पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांनी भोकरदन येथे जनतेशी संवाद साधताना दिली.
उपविभागीय कार्यालय व भोकरदन पोलिस ठाण्याच्या तपासणीसाठी विश्वास नांगरे हे भोकरदन शहरात आले होते. यावेळी त्यांनी उपविभागातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीबाबत माहिती घेऊन गुन्हेगाराविरूध्द कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. भोकरदन पोलिस ठाण्यामध्ये नागरिक व पत्रकारांशी संवाद साधताना नागरिकांच्या तसेच महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन त्याची तात्काळ दखल घेतली. यावेळी महिलांनी छेडछाड, रोडरोमिओ, अवैध दारू, गुटखा याबाबत माहिती दिली असता त्यानी सर्व पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. ठाण्याच्या परिसरात दामिनी पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांना दिल्या़ त्याच प्रमाणे अनेक तरूण नशा म्हणून केमिकल व औषधींचा वापर करीत आहेत. त्याची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या़ तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे नांगरे म्हणाले. यावेळी पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी इश्वर वसावे, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस निरीक्षक योगीराज शेवगण, जाफराबादचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, वाचक पोलिस निरिक्षक शिनगारे, पारधचे सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण बिडवे, हासनाबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार, टेंभूर्णीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निंभोरे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, पत्रकार, पोलिसमित्र, महिला, व्यापारी तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ (वार्ताहर)

Web Title: Damini squad will be established in every police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.