‘धरण उशाला अन् कोरड घशाला’
By Admin | Updated: September 12, 2014 00:32 IST2014-09-12T00:15:26+5:302014-09-12T00:32:21+5:30
औरंगाबाद : ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशीच काहीशी अवस्था सिडको एन-७, एन-८ परिसरातील नागरिकांची होत असून,

‘धरण उशाला अन् कोरड घशाला’
औरंगाबाद : ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशीच काहीशी अवस्था सिडको एन-७, एन-८ परिसरातील नागरिकांची होत असून, अधिकारी व उद्योग क्षेत्राशी निगडित असल्याने पाणी, सफाई, सुरक्षिततेसाठी भांडावे कसे, असाच प्रश्न आजमितीला नागरिकांना धोक्याचा व खर्चिक ठरत आहे.
सिडको- हडकोला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ सिडको एन-७ आणि एन-५ परिसरात आहे.
अगदी उतारावर असलेल्या भागात धो-धो पाणीपुरवठा होत असेल असा समज अगदी चुकीचा ठरत आहे. चार दिवसांआड येणारा पाणीपुरवठा तोही कमी दाबाने असून, पाणीपुरवठ्याची वेळही नक्की नसते. सफाई कर्मचारी फिरकत नसल्याने कचराकुंड्या भरून भोवती कचरा पसरत आहे. औषध फवारणी करणारे कर्मचारी रस्त्याने अधूनमधून फिरताना दिसतात. अंतर्गत औषध फवारणी होत नाही.