त्रुटीची सेवा दिल्याने नुकसान भरपाईचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:33 IST2017-07-13T00:31:27+5:302017-07-13T00:33:50+5:30

परभणी : ग्राहकाला त्रुटीची सेवा दिल्याच्या कारणावरून आयडीया सेलूलर सर्व्हिसेस या कंपनीने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी,

Damage order given by serving error | त्रुटीची सेवा दिल्याने नुकसान भरपाईचा आदेश

त्रुटीची सेवा दिल्याने नुकसान भरपाईचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ग्राहकाला त्रुटीची सेवा दिल्याच्या कारणावरून आयडीया सेलूलर सर्व्हिसेस या कंपनीने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे़ या प्रकरणाची माहिती अ‍ॅड़ पवन उपाध्याय यांनी दिली़
शीतल विनोदकुमार साखला यांनी आयडीया कंपनीविरूद्ध जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती़ साखला यांनी पोर्टेबिलीटी सेवे अंतर्गत त्यांचा मोबाईल क्रमांक आयडीया कंपनीतून व्होडाफोन कंपनीत परावर्तीत केला होता़ व्होडाफोन कंपनीची सेवा काही दिवस वापरल्यानंतर कंपनीने साखला यांना कोणतीही पूर्वसूचना न देता आयडीया सेलूलर सर्व्हिसेसच्या सांगण्यावरून थकीत देयक न भरल्या प्रकरणी त्यांची मोबाईल सेवा खंडित केली होती़ हे प्रकरण न्यायमंचात दाखल झाल्यानंतर आयडिया सेल्युलर सर्व्हिसेसने व्होडाफोन मोबाईल कंपनीस केलेली विनंतीही टेलीकॉम रेग्युलॅरिटी अँड अ‍ॅथॉरिटी अ‍ॅक्ट नियमांचे उल्लंघन करणारी आहे़ अर्जदारास थकीत देयकासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता अर्जदार वापरत असलेली मोबाईल सेवा खंडित करणे चुकीचे आहे़ त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यान्वये आयडीया सेल्युलर सर्व्हिसेसने केलेले कृत्य त्रुटीचे ठरते, असे साखला यांच्या वतीने अ‍ॅड़ पवन उपाध्याय यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचच्या निदर्शनास आणून दिले़

Web Title: Damage order given by serving error

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.