स्मशानभूमीचे नुकसान; पाचजणांविरुध्द गुन्हा
By Admin | Updated: August 18, 2016 00:55 IST2016-08-18T00:45:29+5:302016-08-18T00:55:24+5:30
नळदुर्ग/अणदूर : सार्वजनिक स्मशानभूमीतील बांधकाम पाडून सात लाख रुपयांचे नुकसान केल्याच्या तक्रारीवरून पाचजणांविरुद्ध नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्मशानभूमीचे नुकसान; पाचजणांविरुध्द गुन्हा
नळदुर्ग/अणदूर : सार्वजनिक स्मशानभूमीतील बांधकाम पाडून सात लाख रुपयांचे नुकसान केल्याच्या तक्रारीवरून पाचजणांविरुद्ध नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे बुधवारी दिवसभर गावात तणावाचे वातावरण होते.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, निलेगाव येथील गट क. ३५१ मध्येगावातील मराठा, धनगर व कैैकाडी या समाजाची स्मशानभूमी आहे. मागील अनेक वर्षांपासून येथे अंत्यविधी पार पडतात. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अनुदानातून २००६ मध्ये बांधकामही करण्यात आले होते. असे असले तरी सदर जमिनीची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डवर नव्हती. या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या स्मशानभूमीची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी घेण्याचा ठराव घेण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी गावातीलच हमीद मनोज कुरणे, हुसेन मनोज कुरणे, आजीम हमीद कुरणे, नजीम हमीद कुरणे व अकिलाबी हमीद कुरणे यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने स्मशानभूमीतील बांधकाम पाडून सात लाखांचे नुकसान केले, अशी तक्रार नामदेव धोंडीबा दुधभाते यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरुन गुन्हा नोंद झाला असून, तपास पोउपनि सय्यद करीत आहेत.