भांबर्डा येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची जि. प. अध्यक्षांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:05 IST2021-06-11T04:05:22+5:302021-06-11T04:05:22+5:30
भांबर्डा येथील गट नंबर १७ जवळ डोंगर भागातील पाणी जाण्यासाठी जुना नाला होता. तो नाला समृद्धी महामार्गाला अडसर ठरत ...

भांबर्डा येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची जि. प. अध्यक्षांकडून पाहणी
भांबर्डा येथील गट नंबर १७ जवळ डोंगर भागातील पाणी जाण्यासाठी जुना नाला होता. तो नाला समृद्धी महामार्गाला अडसर ठरत असल्याने तो नाला बंद करून चुकीच्या दिशेला वळविल्याने गावातील लगत असलेल्या शेतात, गोठ्यात व कांदा चाळीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच समृद्धी महामार्गालगत असलेल्या डाळिंब बागेतही पावसाचे पाणी शिरल्याने जणू पूरच वाहत असल्याचे चित्र बुधवारी दिसून आले होते. या पुराच्या पाण्यामुळे फळबागेसह, कपाशी, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच जागोजागी शेतातील बंधारे फुटल्याने शेतातील कसदार माती व गोठ्यातील जनावरांचा चाराही वाहून गेला आहे. सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून उद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करावा, अशा सूचना मीनाताई शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी तालुका कृषी अधिकारी हर्षदा जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके, मंडल अधिकारी देवलाल केदारे, कृषी सहायक संजीव साठे, तलाठी वैशाली कांबळे, ग्रामसेवक अनिल केंद्रेकर, पं. स. सभापती राजू घागरे, भांबर्डाचे सरपंच भीमराव पठाडे, उपसरपंच सजन शिंदे उपस्थित होते.
फोटो :
भांबर्डा येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, रामराव शेळके, तहसीलदार ज्योती पवार आदी.
100621\10_2_abd_102_10062021_1.jpg
भांबर्डा येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करतांना जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, रामराव शेळके,तहसीलदार ज्योती पवार आदी.