धरण व नद्यांचे पाणी दूषित
By Admin | Updated: June 6, 2014 01:11 IST2014-06-06T00:49:15+5:302014-06-06T01:11:26+5:30
औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे भूजल पातळी घटत असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर होत आहे.

धरण व नद्यांचे पाणी दूषित
औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे भूजल पातळी घटत असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. जायकवाडी धरण, गोदावरी नदीचे पाणी थेट पिण्यासाठी अयोग्य, तर खाम नदीचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठीही योग्य नसल्याचे जलसंपदा विभागाच्या जलगुणवत्ता प्रयोगशाळेतील सूत्रांनी सांगितले.
प्रयोगशाळेत दर महिन्याला गोदावरी नदीच्या नेवासा, येली, टाकळी धनगर, गंगाखेड आदी ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. शहरातून जाणार्या खाम नदीचे शेंदुरवादा, छावणी परिसरातील पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली जाते.
दरमहा होणार्या या तपासणीत गोदावरी नदीचे पाणी शेती वापरासाठी योग्य असल्याचे व नदीपात्रातील पाणी क्षारयुक्त असल्याने थेट पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. खाम नदीमध्ये शहरातील घाण पाणी सोडल्यामुळे नदी पूर्ण प्रदूषित झाली असून, पाणी शेती व पिण्यासाठी योग्य नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. जायकवाडी धरणात खाम नदी व इतर नद्यांचे पाणी प्रक्रिया न करता सोडल्यामुळे दूषित झाले आहे. जायकवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी योग्य नाही.
१३ वर्षांत ४,२७५ नमुन्यांची तपासणी
जल गुणवता प्रयोगशाळा स्तर क्र. २ मध्ये शहरासह मराठवाड्यातील ४,२७५ खाजगी पाणी नमुन्यांची तपासणी केली आहे.
२००१-२००२ मध्ये दोन पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली तर २००२-२००३ मध्ये १२९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
२००३-२००४ मध्ये ६५ नमुन्यांची तपासणी केली आहे. सर्वांत जास्त २०११-२०१२ मध्ये ८४६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.