४ लाखांवर डल्ला
By Admin | Updated: June 1, 2014 00:25 IST2014-05-31T23:48:54+5:302014-06-01T00:25:00+5:30
चाकूर : तालुक्यातील घरणी शिवारातील एका शेतकर्याच्या घरात दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना शुक्रवारी घडली आहे़

४ लाखांवर डल्ला
चाकूर : तालुक्यातील घरणी शिवारातील एका शेतकर्याच्या घरात दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना शुक्रवारी घडली आहे़ या घटनेत रोख व सोने, चांदीचे दागिने असा ४ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे़ याप्रकरणी शनिवारी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घरणी शिवारातील अभंगे यांच्या शेतात उत्तमराव राजाराम रकटाटे हे शेती कसून पत्नी, दोन मुले व सुनेसह तेथेच वास्तव्यास असतात़ दरम्यान, त्यांनी अंबुलगा शिवारात आपल्या घराचे बांधकाम सुरु केले आहे़ या बांधकामासाठी रकटाटे यांनी घरणी येथील घरात २ लाख रुपये रोख आणून ठेवले होते़ तसेच कुटुंबियांचे नेकलेस, झुमके, अंगठ्या, सरपाळे असे २ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे-दागिनेही ठेवण्यात आले होते़ दरम्यान, शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वच जण कामानिमित्त घराबाहेर पडले होते़ ही संधी साधून चोरट्यांनी रकटाटे यांच्या घरात धाडसी चोरी करीत रोख व दागिने असा ४ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला आहे़ याप्रकरणी उत्तमराव रकटाटे यांनी शनिवारी चाकूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर) लातुरातही चोरी लातुरातील अष्टविनायक मंदिराजवळ राहणार्या विपुल रोईसर हे मेहुण्याचा अपघात झाल्याने घरास कुलूप लावून पुण्याला गेले होते़ दरम्यान, चोरट्यांनी कुलूप तोडून या घरातील ७ हजार रुपये पळूवन नेले आहेत़