दलित ऐक्याची वज्रमूठ !

By Admin | Updated: October 15, 2016 00:28 IST2016-10-15T00:21:00+5:302016-10-15T00:28:57+5:30

बीड : कोपर्डी (ता. कर्जत) प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित ऐक्य मूक मोर्चा धडकणार आहे.

Dalit unity! | दलित ऐक्याची वज्रमूठ !

दलित ऐक्याची वज्रमूठ !

बीड : कोपर्डी (ता. कर्जत) प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित ऐक्य मूक मोर्चा धडकणार आहे. अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त अन्याय-अत्याचाराविरुद्ध पहिल्यांदाच एकवटले असून विराट गर्दी होणार आहे. महिला- मुलींच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ऐक्याची वज्रमूठ आवळल्याने या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
महिनाभरापासून दलित ऐक्याची ‘मोर्र्चे’बांधणी सुरु होती. वाड्या, वस्त्या, तांड्यांवर व तालुका, शहर स्तरावर बैठका झाल्या. अन्याय- अत्याचाराविरुद्धची ही लढाई बिगर नेतृत्वाची आहे. सामान्य महिला व महाविद्यालयीन विद्याथिनी मोर्चाच्या अग्रभागी असतील. त्यांच्याकडेच नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. दलित, आदिवासी व भटके विमुक्त समाजबांधव पहिल्यांदाच निळ्या झेंड्याखाली एकत्रित येत आहेत. विविध जातींचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून पांढऱ्या रंगाचा ‘ड्रेस कोड’ असल्याने मोर्चात शिस्तीचे दर्शन घडणार आहे. मोर्चाच्या अनुषंगाने धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक गढी, मांजरसुंंबा येथून वळवली आहे.
शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. दीड हजारावर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. त्यांच्या सोबत ५ हजार स्वयंसेवकही नेमण्यात आले आहेत. मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पाणी, नाष्त्याची सोय केली आहे. मोर्चाच्या पाठीमागे लगेचच स्वच्छतेसाठी स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Dalit unity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.