अधिकाऱ्यांची दांडीयात्रा !
By Admin | Updated: March 27, 2017 23:46 IST2017-03-27T23:45:37+5:302017-03-27T23:46:14+5:30
कडा आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासकीय कार्यालयात लगबग असते. मात्र, येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात सोमवारी दिवसभर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता.

अधिकाऱ्यांची दांडीयात्रा !
नितीन कांबळे कडा
आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासकीय कार्यालयात लगबग असते. मात्र, येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात सोमवारी दिवसभर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता. शिपायावरच कार्यालयाची भिस्त होती. ‘लोकमत’च्या स्टिंगमधून हा प्रकार समोर आला.
तालुक्यातील अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार देणे, कुपोषित बालकांची कलगी घेणे, गरोदर मातांना व किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणे यासह अनेक कामे करून देखरेख करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक बालविकास कार्यालय आहे; पण येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कामामुळे तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची कामे खोळंबत आहेत. यातच सलग सुट्यांमुळे अधिकचा व्यत्यय होत आहे.
एकात्मिक बालविकास कार्यालयात सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता शिपाई सोडता दहा सुपरवायझर व एक अधिकारी हे सर्वच कार्यालयात गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे अधिकारी - कर्मचाऱ्यांना कामाचे किती गांभीर्य आहे हे दिसून येते. या कार्यालयातील कामचुकार अधिकारी कर्मचऱ्यांवर वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक गरूड यांनी केली आहे.
बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी भ्रमणध्वनी उचलला नसल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.