२० कोटी लिटरची दररोज घट
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:10+5:302016-04-03T03:50:37+5:30
राजेश खराडे , बीड सबंध शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होत आहे. शनिवारपर्यंत येथील धरणात ६८.६० द.ल.घनमीटर ऐवढा पाणीसाठा होता.

२० कोटी लिटरची दररोज घट
राजेश खराडे , बीड
सबंध शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होत आहे. शनिवारपर्यंत येथील धरणात ६८.६० द.ल.घनमीटर ऐवढा पाणीसाठा होता. वाढते बाष्पीभवन व पाणी चोरीमुळे दिवसाकाठी कोटी- कोटी लीटरने पाणीसाठ्यात कमी होत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व जलस्त्रोत आटल्याने शहराची मदार माजलगाव धरणावर आहे. दोन लाख वीस हजारच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहराला दिवसाला ०.०२ द.ल.घनमीटर ऐवढे पाणी लागत आहे. शेवटपर्यंतच्या नागरिकाला पाणीपुरवठा व्हावा या हेतूने दीड ते दोन तास पाणी आठ दिवसातून सोडले जात आहे. जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करता यावा या उद्देशाने नियोजन केले असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंते एम.एस. वाघ यांनी सांगितले. १ एप्रिल रोजी धरणात ६९.८० द.ल.घ. मीटर ऐवढे पाणी होते २ एप्रिल रोजीच हा पाणी ६९.६० द.ल.घ मीटर आला होता.
वाढते बाष्पीभवन व धरण परिसरात होत असलेली पाणीचोरी यामुळे साठ्यात मोठी घट होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे ही काळची गरज झाली आहे. पाणी पुरवठा होण्यासाठी नगरपालिकेने शहरात २८, ४६३ नळ कनेक्शन दिले आहेत. शिवाय आता नव्याने हद्दवाढ भागात झालेले कनेक्शन वेगळेच. किमान आठ दिवसातून पाणी पुरवठा होत असल्याने शहरवासीयांची होणारी गैरसोय टळली आहे. प्रत्येक भागात दीड ते दोन तास पाणी पुरवठा केला जात आहे.