शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

रोज नियोजन शंभरचे, डोस दोनशे जणांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही केंद्रांवर रोजच्या नियोजनापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत आहे. एका केंद्रावर ...

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही केंद्रांवर रोजच्या नियोजनापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत आहे. एका केंद्रावर १०० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन असताना, प्रत्यक्षात लसीकरण दोनशे जणांना होत आहे. त्यामुळे पहिला डोस १५ फेब्रुवारीपूर्वी संपविण्यासाठी ही घाई होत आहे का, प्रत्येक आरोग्य कर्मचारी अर्धा तास निगराणीत थांबत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी १६ जानेवारी रोजी को-विन अ‍ॅप डाऊनलोड होऊ शकले नाही. त्यामुळे ऑफलाइन प्रक्रिया करण्यात आली, परंतु त्यानंतर ऑनलाइन पद्धतीनेच लसीकरणाची प्रक्रिया करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार, प्रत्येक केंद्रांवर १०० जणांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. शहरातील एका मोठ्या रुग्णालयातील केंद्रावरच रोज ३०० जणांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. उर्वरित ठिकाणी १०० कर्मचाऱ्यांना डोस देण्याचे नियोजन आहे, परंतु यातील काही केंद्रांवर त्यापेक्षा अधिक लसीकरण होत असल्याची परिस्थिती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमाेर आहे. त्यातूनच नियोजनापेक्षा अधिक लोकांना लस देण्यात येत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एका दिवसातील स्थिती

२७ जानेवारी रोजी १०० जणांचे नियोजन असलेल्या क्रांतिचौकअंतर्गत केंद्रावर १३५ जणांचे लसीकरण झाले, तर अन्य एका केंद्रावर २०१ जणांना डोस देण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर म्हणाल्या, लसीकरणाच्या पोर्टलवर नोंदणी केलेले आरोग्य कर्मचारी आले नाही, तर इतर कर्मचाऱ्यांना लस देता येत आहेत. त्यासाठी आता ऑन द स्पॉट अ‍ॅलोकेशनला मंजुरी मिळाली आहे.

नवीन सुविधा

चार दिवसांपूर्वी ‘अ‍ॅड बेनिफिशरी’ अशी सुविधा (ऑप्शन) मिळाली आहे. नियोजनातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील दिवसांतील कर्मचाऱ्यांनाही डोस देणे शक्य झाले आहे. कर्मचारी तयार असेल, तर त्यांना लवकर लस देता येत आहे. प्रत्येक कर्मचारी अर्धा तास निगराणीत थांबतात.

- डॉ.सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी