बाप्पावरही दुष्काळाची वक्रदृष्टी
By Admin | Updated: August 25, 2014 01:35 IST2014-08-25T00:22:42+5:302014-08-25T01:35:52+5:30
जालना: गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी जिल्हा सज्ज होतो आहे. मात्र पाऊस ओढ देत असल्यामुळे पडलेल्या दुष्काळाची बाप्पावरही

बाप्पावरही दुष्काळाची वक्रदृष्टी
जालना: गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी जिल्हा सज्ज होतो आहे. मात्र पाऊस ओढ देत असल्यामुळे पडलेल्या दुष्काळाची बाप्पावरही वक्रदृष्टी असल्याचे दिसून येते. दुष्काळाचे कारण सांगत गणपती मूर्ती तसेच इतर साहित्याच्या किंमतीत काहीअंशी वाढ झाली आहे.
गणेशोत्सवासाठी मूर्तींची स्थानिक कलाकार तसेच पर जिल्ह्यातूनही मोठी आवक वाढत आहे. शहरातील सिंधी बाजार, महात्मा फुले मार्केट, बसस्थानक परिसर, चमन, शनि मंदिर, शिवाजी पुतळा, चंदनझिरा आदी भागात मूर्तींची विक्री होते. गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांसह बाजारतही आनंदाचे वातावरण होते. यंदा मात्र पावसाने दगा दिल्याने परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. दुष्काळाच्या नावाखाली बाजारात तेजी- मंदी वाढत आहे.
जालना शहरात कोकणातील पेणसह नगर, मुंबई, इंदौर आदी भागातून विविध आकारातील, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. बाजारपेठ गणेश मूर्तींनी सजली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात गणेश मूर्तींची मोठी बाजारपेठ आहे. वीस ते पंचवीस दुकाने येथे लागतात. १ फुटा पासून पंचवीस फुटापर्यंतची मूर्ती येथे विक्रीस उपलब्ध आहे.
यंदा शिवाजी महाराजांच्या पेहरावातील, लालबागचा राजा, जय मल्हार, मोर, तबल्यावर बसलेला तसेच सिंहासनावर अरुढ असलेल्या मूर्तींची संख्या जास्त आहे. मूर्तीकार कन्हैया संत्रे म्हणाले, दुष्काळामुळे काहीअंशी किंमती वाढल्या आहेत. आकर्षक व रेखीव मूर्तींची किंमत जास्त आहे. स्थानिक कलाकारांनी उंच मूर्ती तयार केल्याने मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)