शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

पप्पा, तुम्हीही लहान गणेश मूर्ती बनवल्या असत्या तर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 7:29 PM

मूर्तिकाराच्या निष्पाप मुलीचा प्रश्न 

ठळक मुद्देमोठ्या मूर्ती बनविणारे मूर्तिकार आर्थिक संकटात सरकारने काहीतरी मार्ग काढण्याची अपेक्षा 

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : पप्पा, तुम्हीही लहान गणेशमूर्ती बनविल्या असत्या, तर गणेशोत्सवात आपल्याकडेही पैसे  आले असते आणि आपणही मजा केली असती. बघा ना आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांकडे आता पैसे येणार आहेत. तुम्ही लहान मूर्ती का नाही बनविल्या, हा प्रश्न जेव्हा माझी लेकरं विचारतात, तेव्हा  त्यांच्या डोळ्यातील दु:ख पाहून आतडी पिळवटून निघतात, अशा शब्दांत मूर्तिकार दूधनाथ चव्हाण यांनी  त्यांची व्यथा मांडली. 

कोरोना आणि पर्यावरण ही कारणे दर्शवून शासनाने सार्वजनिक गणेश मंडळातील गणेशमूर्ती ४ फुटांपर्यंतच असतील, असा निर्णय जाहीर केला. यामुळे केवळ मोठ्या मूर्तीच बनविणारे मूर्तिकार आर्थिक संकटात सापडले आहेत. आमच्याकडच्या मूर्तीच विकल्या गेल्या नाहीत, तर आता पुढच्या गणेशोत्सवापर्यंत आमच्या पोटापाण्याची व्यवस्था सरकार पाहणार? की आम्हालाही एक लाखाची मदत जाहीर करणार आहे?  असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित  केला आहे. 

२५ वर्षांपासून चव्हाण सेव्हन हिल परिसरात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करतात. ६ फुटांपेक्षा उंच मूर्ती बनविणे ही त्यांची खासियत आहे. जिल्हा आणि बाहेरीलही अनेक गावांतील गणेश मंडळांकडूून त्यांना गणेशमूर्तींसाठी आॅर्डर येत असते. सध्या त्यांच्याकडे ४० ते ४५ गणेशमूर्ती तयार आहेत. एका गणेशमूर्तीची केवळ रंगरंगोटी करण्यासाठीच १,८०० ते २,५०० एवढा खर्च येतो. या सर्व मूर्तींसाठी त्यांनी आतापर्यंत अडीच ते तीन लाख रुपये गुंतविले आहेत. मूर्तींची विक्री झाली की कर्ज फेडायचे, हे मूर्तिकारांचे नेहमीचे गणित आहे; पण आता मात्र मूर्तीच विकल्या गेल्या नाहीत, तर कर्ज कसे फेडायचे  यामुळे ते हवालदिल झाले आहेत. दरम्यान बुधवारी चव्हाण यांची अभिजित देशमुख< बाळासाहेब औताडे आदी कार्यकर्त्यांनी भेट घेऊन यातून काही मार्ग काढण्याचे बोलून दाखविले.

मुलींकडे पाहून संयम ठेवला कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, हा एक मोठा प्रश्न समोर उभा आहे. खूप विचार डोक्यात येतात; पण मी जर काही करून घेतले, तर माझ्या मुलींचे काय होणार, हा विचार करून शांत होतो. पोराच्या पायातले वाळे विकले आहेत. हातगाडी घेऊन दुसरा धंदा सुरू करावा, तर त्यासाठीही जवळ पैसे नाहीत,  असे चव्हाण  यांनी सांगितले. 

४ फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींनीच कोरोना पसरणार का?चार फुटांचीच गणेश मूर्ती बसविण्याचे धोरण जाहीर करण्यामागे सरकारचे काय अजब धोरण आहे, हे कळायला मार्ग नाही. चार फुटांपेक्षा  कमी आकाराच्या मूर्तींनीच कोरोना पसरणार आहे का? चार फूट असो किंवा ६, ८ फूट असो, ती उचलायला तेवढीच माणसे लागतात. एवढेच असेल, तर सोशल डिस्टन्सिंग पाळत मूर्ती मंडळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी मी पार पाडतो, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या