शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

दाभोलकर हत्या प्रकरण: सचिनकडे आल्याचे सांगत एटीएसने केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 2:47 AM

निरालाबाजार भागातील कुलकर्णीच्या हॉटेलवर सचिन अणदुरेचा नेहमी वावर होता, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली.

औरंगाबाद : निरालाबाजार भागातील कुलकर्णीच्या हॉटेलवर सचिन अणदुरेचा नेहमी वावर होता, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली. कुलकर्णी सनातनचे स्थानिक सर्वेसर्वा आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखालीच सर्व कामकाज चालते. सचिन मागील काही वर्षांपासून स्लीपर सेलसारखी भूमिका बजावत होता. कुलकर्णीच्या मार्गदर्शनानुसार सचिनही इतर साधकांप्रमाणे काम करीत होता, अशीही माहिती समोर येत आहे.‘त्या दिवशी चार ते पाच जणांना इमारतीत घुसताना पाहून घरमालक राधाकिसन शिंदे यांनी त्यांना हटकले. आम्ही सचिनकडे आलोय, असे सांगत ते थेट सचिनच्या घरात गेले. त्यानंतर तासभर घरात थांबून ते सचिनला सोबत घेऊन मुंबईला गेले. तेव्हा पोलिसांनी सचिनला नेल्याची कल्पनाही शिंदे यांना आली नाही; परंतु त्याच दिवशी सचिनची पत्नी मुलीसह माहेरी गेल्याने चार दिवसांपूर्वी त्याच्या घराला कुलूप आहे, असे शिंदे यांनी सांगितले.औरंगाबादकर हादरले...दाभोलकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्टÑ हादरला होता. या हत्येप्रकरणी औरंगाबादहून सचिनला अटक झाली. शनिवारी रात्री सीबीआयने सचिनला अटक केल्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे औरंगाबादकरांनाही धक्काच बसला. दाभोलकर यांचे मारेकरी औरंगाबादेत सापडतील याचा विचारही त्यांनी केला नव्हता. रात्री उशिरा हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच एकच खळबळ उडाली होती. अनेक जण सचिन अणदुरे कोण, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होता.१४ पासून घराला कुलूपसचिन अणदुरेला १४ आॅगस्टला पोलीस मुंबईला घेऊन गेले. त्यानंतर त्याची पत्नी घराला कुलूप लावून कोठे गेली, हे घरमालक शिंदे यांना सांगता आले नाही. त्यास एक भाऊ असून, तो गारखेडा परिसरात राहतो. कुंवारफल्लीतील नागरिकांनाही सचिनबद्दल फारशी माहिती नाही. तो शांत स्वभावाचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.दहा महिन्यांपूर्वी भाडेकरू म्हणून आलासचिन राहतो ते घरमालक राधाकिसन बाबूराव शिंदे (रा. कुंवारफल्ली) हे महाराष्ट्र बँकेतून नुकतेच निवृत्त झाले. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, ते बँकेत कार्यरत असताना सचिन कापड दुकानदाराच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी नेहमी येई. त्यामुळे त्याची ओळख झाली. त्यावेळी तो धावणी मोहल्ल्यात राहत होता. दहा महिन्यांपूर्वी तो माझ्या घरात भाडेकरू म्हणून आला. तीन महिन्यांपूर्वी त्यांना मुलगी झाली. दोघेही पती-पत्नी कामाला जात. तो न चुकता नियमित भाडे द्यायचा. तो मितभाषी आहे. तो रोज सकाळी कामावर जायचा आणि रात्री दहा वाजेनंतर घरी परत यायचा.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर