दगाफटक्याच्या राजकारणाला थारा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:59 IST2017-08-12T23:59:09+5:302017-08-12T23:59:09+5:30
मला मदत करणाºयांना मी कदापि विसरणार नाही. सुरेश धस ही आता तुमची नव्हे माझी जबाबदारी असल्याचा विश्वास देत आता बीड जिल्ह्यात दगाफटक्याच्या राजकारणाला थारा देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

दगाफटक्याच्या राजकारणाला थारा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : मला मदत करणाºयांना मी कदापि विसरणार नाही. सुरेश धस ही आता तुमची नव्हे माझी जबाबदारी असल्याचा विश्वास देत आता बीड जिल्ह्यात दगाफटक्याच्या राजकारणाला थारा देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
पंकजा मुंडे यांनी शनिवारी सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आ.भीमराव धोंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सर्जेराव तांदळे, संतोष हंगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
मुंडे पुढे म्हणाल्या, सुरेश धस यांच्या मदतीने बीड जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी घेतलेला निर्णय माझ्यासाठी स्वप्नवत होता. राजकारणात आता मी मोदी पॅटर्न अवलंबण्याचे ठरविले असून कोणताही निर्णय बैठकीद्वारे जाहीर न करता मी अगोदर बंद खोलीत चर्चा करून मगच तो जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. धोंडे म्हणाले, सुरेश धस यांच्या कुटुंबाशी माझे पूर्वीपासून घनिष्ट संबंध आहेत. धसांमुळे जिल्हा परिषद ताब्यात आल्यामुळे आष्टी मतदारसंघ हा भाजपच्या दृष्टीने सर्वात सुरिक्षत झाला आहे. या वेळी सुरेश धस समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.