वेरूळ लेणी परिसरात सिलिंडर स्फोट
By Admin | Updated: October 22, 2015 20:52 IST2015-10-22T02:04:16+5:302015-10-22T20:52:27+5:30
वेरूळमधील जगप्रसिद्ध लेण्यांपैकी लेणी क्रमांक ३२ समोरील उपाहारगृहात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन उपाहारगृह खाक झाले. सुदैवाने

वेरूळ लेणी परिसरात सिलिंडर स्फोट
- आगीत उपाहारगृह खाक
खुलताबाद : वेरूळमधील जगप्रसिद्ध लेण्यांपैकी लेणी क्रमांक ३२ समोरील उपाहारगृहात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन उपाहारगृह खाक झाले. सुदैवाने हा स्फोट रात्री झाल्याने परिसरात कोणीही नव्हते. त्यामुळे जिवीत हानी झाली नाही.
वेरूळमध्ये जगप्रसिद्ध ३४ लेण्या आहेत. जैनधर्र्मीय लेणी क्रमांक ३२ येथे पुरातत्व खात्याने उपाहारगृह व शौचालय बांधलेले आहे. या उपाहारगृहाची इमारत असताना मालकाने वाहनतळातच ताडपत्री टाकून हे उपाहारगृह थाटले आहे.
याच उपाहारगृहात बुधवारी
रात्री साडेआठच्या सुमारास
सिलिंडरचा स्फोट झाला. पाठोपाठ
आगही लागली. या आगीच्या ज्वाळा आकाशात दिसल्यानंतर सुरक्षारक्षक घटनास्थळी धावले. पुरातत्व खात्याचे अधिकारीही पोहोचले. पुरातत्व खात्याचे हुकरे, राजेश वाकलेकर या अधिकाऱ्यांनी एक टँकर मागविला.
टँकर पोहोचेपर्यंत सर्व खाक
झाले होते. उपाहारगृहात काहीच शिल्लक राहिले नव्हते. सहा वाजता सर्व लेण्या
बंद होतात. सर्वांना बाहेर काढले जाते. त्यामुळे या हॉटेलमध्ये कोणीच नव्हते. दुपारच्या वेळी ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.