महिला दिनानिमित्त सायकलिंग रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:33 IST2018-03-08T00:32:51+5:302018-03-08T00:33:10+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त औरंगाबाद सायकलिंग संघटना व गेट गोइंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता सायकलिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सशक्त करण्यासाठी ही संघटना पुढाकार घेते, त्याचाच हा भाग आहे.

महिला दिनानिमित्त सायकलिंग रॅली
औरंगाबाद : जागतिक महिला दिनानिमित्त औरंगाबाद सायकलिंग संघटना व गेट गोइंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता सायकलिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सशक्त करण्यासाठी ही संघटना पुढाकार घेते, त्याचाच हा भाग आहे. या रॅलीला आकाशवाणी चौकातून सकाळी ६ वाजता सुरुवात होईल. सिडको बसस्थानक, जळगाव रोड, हर्सूल टी पॉइंट, दिल्लीगेट, मिलकॉर्नर, बसस्थानक, बाबाचौक, क्रांतीचौकमार्गे आकाशवाणीला समारोप होईल. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी डॉ.उमा महाजन, जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, सचिव चरणजितसिंग संघा यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त महिला, मुलींसह सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.