शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

सायबर गुन्हेगारांनी थेट सीमकार्ड केले ब्लॉक; चोवीस तासांत ३ लाख लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:25 IST

सीम कंपनीने सीमकार्ड करप्ट झाल्याचे कारण दिले. मात्र, ते कसे झाले, कशामुळे याबाबत चित्र स्पष्ट झाले नाही.

छत्रपती संभाजीनगर : फसवण्याचे जाळे टाकूनही व्यक्ती त्यात अडकत नसल्याने सायबर गुन्हेगारांनी त्याचे थेट सीमकार्ड ब्लॉक करून चोवीस तासांत ३ लाख २४ हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे, सायबर पोलिसांनी तब्बल नऊ महिन्यांनी या प्रकरणी क्रांती चौक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

खेळाडूंच्या कपड्यांची निर्मितीचा व्यवसाय असलेल्या राकेश गुराल्ले यांना काही महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने कॉलद्वारे संपर्क साधला. हिंदी भाषेतून 'तुमचे नवे क्रेडिट कार्ड आले आहे' असे सांगत पॅन क्रमांकाची मागणी केली. राकेश यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते केदारनाथला जाण्यासाठी निघाले असता त्यांचे सीमकार्ड बंद पडले होते. दिल्ली येथे पोहोचल्यावर त्यांनी त्याच क्रमांकाचे नवे सीमकार्ड घेऊन सुरू केले. मात्र, त्यांना अचानक त्यांच्या व्यावसायिक बँक खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये कमी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी १९३० या हेल्पलाईनवर तक्रार केली. युपीआयडी बंद होऊनही काही दिवसांत त्यांच्या व्यवसायाच्या खात्यातून पुन्हा वेळोवेळी १ लाख ६४ हजार रुपये विश्वजित मंडल नामक व्यक्तीच्या बँक खात्यावर वळते होत गेले.

कारण मात्र निष्पन्नच नाहीसीम कंपनीने सीमकार्ड करप्ट झाल्याचे कारण दिले. मात्र, ते कसे झाले, कशामुळे याबाबत चित्र स्पष्ट झाले नाही. राकेश यांनी ऑनलाईनसह जून, २०२४ मध्ये आयुक्तालयातील सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तपासाचे कारण देत सहा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी क्रांती चौक पोलिसांकडे अर्ज वर्ग केला. मात्र, त्यातही कुठले फसवणुकीचा ठोस कारण, प्रकार स्पष्ट केला गेला नाही.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी