किरकोळ कारणावरून एकावर कटरने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:54+5:302020-12-17T04:30:54+5:30

अक्षय दुधे असे आरोपीचे नाव आहे. ================ तीन बोकडांची चोरी औरंगाबाद : सातारा परिसरातील गोठ्यात बांधून ठेवलेल्या तीन बोकडांना ...

Cutter attack on one for trivial reasons | किरकोळ कारणावरून एकावर कटरने हल्ला

किरकोळ कारणावरून एकावर कटरने हल्ला

अक्षय दुधे असे आरोपीचे नाव आहे.

================

तीन बोकडांची चोरी

औरंगाबाद : सातारा परिसरातील गोठ्यात बांधून ठेवलेल्या तीन बोकडांना चोरट्यांनी पळविले. १३ डिसेंबर रोजी झालेल्या या घटनेविषयी महिलेने सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली.

===================

क्रूरपणे म्हशीची वाहतूक करणाऱ्यांना पकडले

औरंगाबाद : ट्रकमधून क्रूरपणे २० म्हशींची वाहतूक करणाऱ्या तीन जणांना सातारा पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून २० म्हशींची मुक्तता केली. बायपासवरील गोदावरी टी पॉईंट येथे १३ रोजी सातारा पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी प्रेमदास चव्हाण यांच्या तक्रारीवरून सातारा ठाण्यात तीन जणांवर गुन्हा नोंदविला. मझहर खान सुलेमान खान, रिझवान कुरेशी, महमद रफिक शेख रहेमान अशी आरोपींची नावे आहेत.

==========================

तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

औरंगाबाद : भावाला शिवीगाळ का करतो, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेख अमीन शेख नुजत (रा. पाटोदा) यांच्यावर आरोपी विश्वनाथ अशोक इंगळे याने धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना पाटोदा येथे रात्री झाली. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

=======================

जुन्या वादातून घरात घुसून मारहाण

औरंगाबाद : जुन्या वादातून दोन जणांना घरात घुसून मारहाण करून जखमी केल्याची घटना हडकोतील एन-१३ येथे झाली. याप्रकरणी भूषण श्रीनिवास दराडे यांच्या तक्रारीवरून आरोपी शशिकांत श्रीधर गितेविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविला.

=========================

महिलेला शिवीगाळ करून धमकी

औरंगाबाद : पतीने उसने घेतलेले पैसे परत कर, असे म्हणून एकाने महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याचा प्रतिकार करताच आरोपी दत्ता रंगनाथ मिसाळ याने तिला शिवीगाळ करून धमकावल्याची घटना घडली. याविषयी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Cutter attack on one for trivial reasons