शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

दोन महत्वाची शहरे रेल्वेपासून तोडली, औरंगाबादहून नागरपूरसाठी रोज धावतात ६८ ट्रॅव्हल्स

By संतोष हिरेमठ | Updated: November 17, 2022 18:42 IST

औरंगाबाद-नागपूर : कोरोनापूर्वी ३ रेल्वेंची कनेक्टिव्हिटी, आता फक्त बसचा पर्याय

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षणाबरोबर राजकीयदृष्ट्याही हे शहर महत्त्वाचे आहे. मात्र, औरंगाबादहून नागपूरला जायचे असेल तर सध्या ट्रॅव्हल्स आणि एसटी बसशिवाय पर्यायच उरला नाही. कारण कोरोनाकाळात ३ रेल्वेंची नागपूर कनेक्टिव्हिटीच तुटली आहे आणि त्याकडे लोकप्रतिनिधींबरोबर ‘दमरे’चे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, औरंगाबादहून दररोज ६८ ट्रॅव्हल्स नागपूरसाठी धावत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर काही कालावधीसाठी सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्यांत नंतर रेल्वे सुरू करण्यात आला. या सगळ्यात नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूरऐवजी आदिलाबादहून सुरू करण्यात आली. कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस ही रेल्वे १९ फेब्रुवारी २०२१ पासून लातूरमार्गे वळविण्यात आली, तर अजनी-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस अजूनही रुळावर आलेली नाही. नागपूरला जायचे असेल तर आजघडीला प्रवाशांना ट्रॅव्हल्स, एसटी बसने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरला नाही. ट्रॅव्हल्सने प्रवास करताना खिसा रिकामा करण्याचीही वेळ प्रवाशांवर ओढावत आहे. त्यामुळे नागपूरसाठी पुन्हा एकदा रेल्वे कनेक्टिव्हिटी देण्याची मागणी जोर धरत आहे.

रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळावीऔरंगाबादला नागपूरसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे. सल्लागार समितीच्या बैठकीत दक्षिण मध्य रेल्वेकडे यासंदर्भात मागणी केली जाईल.- महेश मल्लेकर, सदस्य, दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समिती

‘नंदीग्राम’ पूर्वीप्रमाणे चालवाऔरंगाबादहून अलोका, अमरावतीमार्गे नागपूरसाठी नवीन रेल्वे सुरू केली पाहिजे. शिवाय नंदीग्राम एक्स्प्रेसला पुन्हा एकदा नागपूरपर्यंत नेले पाहिजे.- राजकुमार सोमाणी, रेल्वे प्रवासी सेना

दोन रेल्वेंची आवश्यकताऔरंगाबादहून अमरावती आणि औरंगाबाद-नागपूरसाठी रेल्वे सुरू करण्याची गरज आहे. औरंगाबादमार्गे नागपूरसाठी धावणाऱ्या तीन रेल्वेंची कनेक्टिव्हिटी तुटली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक

- औरंगाबादहून नागपूरला धावणाऱ्या ट्रॅव्हल्स : ६८- ट्रॅव्हल्सचे नागपूरसाठीचे भाडे : ७०० रुपये ते २३०० रुपये- औरंगाबादहून नागपूरला धावणाऱ्या एसटी : १३-‘एसटी’चे नागपूरसाठी भाडे : ७६० ते १११०

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन