अनैतिक संबंधात अडसर असलेल्या पतीचा काढला काटा

By Admin | Updated: June 11, 2016 00:15 IST2016-06-10T23:49:46+5:302016-06-11T00:15:40+5:30

औरंगाबाद : मुकुंदवाडी स्टेशन परिसरातील राजनगरातील विलास दादाराव आव्हाड (४०) याच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर मुकुंदवाडी पोलिसांना शुक्रवारी यश आहे.

Cut off the husband who was found hanging in an immoral relationship | अनैतिक संबंधात अडसर असलेल्या पतीचा काढला काटा

अनैतिक संबंधात अडसर असलेल्या पतीचा काढला काटा

औरंगाबाद : मुकुंदवाडी स्टेशन परिसरातील राजनगरातील विलास दादाराव आव्हाड (४०) याच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर मुकुंदवाडी पोलिसांना शुक्रवारी यश आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने विलासचा पत्नी संगीता आव्हाड (३५) हिने प्रियकर शेख गफ्फार शेख गणी (३२, रा. देवळाई) याच्या मदतीने खून केल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी संगीता आणि गफ्फार या प्रेमीयुगुलाला बदनापूर परिसरातून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.
कारवाईबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले की, ३ जून रोजी विलास आव्हाडचे प्रेत चिकलठाणा शिवारातील दहीहंडे वस्तीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये पुरलेले आढळून आले होते. दहा दिवसांपूर्वी खून झालेला असल्याने हे प्रेत अक्षरश: कुजून गेले होते. तपासात हा खून पत्नी संगीतानेच केल्याचे निष्पन्न झाले. अनैतिक संबंधातून हा खून झालेला असावा आणि तिचा प्रियकर गफ्फार व मुलगा किशोरही यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. मात्र, प्रकार उघडकीस आल्यापासून आरोपी फरार होते. तीन दिवसांपूर्वी विलास आव्हाडचा मुलगा किशोर मुकुंदवाडी पोलिसांच्या हाती लागला. त्यापाठोपाठ शुक्रवारी फरार संगीता आणि तिचा प्रियकर शेख गफ्फारही पोलिसांच्या हाती लागला. या दोघांनाही अटक करण्यात
आली.
प्रेमासाठीच केली हत्या
आरोपी संगीता आणि शेख गफ्फार या दोघांचे गेल्या चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. गफ्फार हा वाळूचा व्यवसाय करतो. त्याच्या ट्रॅक्टरवर संगीताचा पती विलास काम करायचा. त्यामुळे गफ्फारचे आव्हाड यांच्या घरी येणे- जाणे होते. त्यातूनच त्याचे संगीतासोबत सुत जुळले आणि अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. ही बाब विलासच्या लक्षात आल्यानंतर त्याने पत्नी संगीताला विरोध दर्शविला. त्यातून त्यांच्यात खटके उडू लागले. विलास अनैतिक संबंधात अडसर ठरू लागल्याने संगीताने गफ्फारच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला अन् मग ‘त्या’ रात्री ठरल्याप्रमाणे तिने पतीच्या जेवणात विष कालविले आणि शुद्ध हरपल्यानंतर पतीला घेऊन ती रिक्षाने चिकलठाण्यातील आपल्या शेडवर आली.
आधीच तेथे गफ्फार येऊन थांबला होता. मग दोघांनी गळा दाबून विलासचा उरलासुरला जीव काढून घेतला. नंतर खड्डा खोदून शेडमध्येच त्याला पुरले, असे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपींनीही तशी पोलिसांसमोर कबुली दिली.
वडिलांच्या खुनाबाबत किशोरला संपूर्ण कल्पना असल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी सांगितले. फौजदार कल्याण शेळके व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Cut off the husband who was found hanging in an immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.