हाता-पायाच्या नसा कापून मित्राचा केला निर्घृण खून

By Admin | Updated: May 7, 2016 00:06 IST2016-05-06T23:54:53+5:302016-05-07T00:06:20+5:30

औरंगाबाद : मित्राला बहिणीच्या घरी नेऊन त्याचे दोरीने हात-पाय बांधले. तीक्ष्ण हत्याराने त्याच्या हाता-पायाच्या नसा कापल्या, तसेच गळ्यावर आणि पोटावर वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला.

Cut off the hands and feet of the nerves and kill the innocent blood | हाता-पायाच्या नसा कापून मित्राचा केला निर्घृण खून

हाता-पायाच्या नसा कापून मित्राचा केला निर्घृण खून

औरंगाबाद : मित्राला बहिणीच्या घरी नेऊन त्याचे दोरीने हात-पाय बांधले. तीक्ष्ण हत्याराने त्याच्या हाता-पायाच्या नसा कापल्या, तसेच गळ्यावर आणि पोटावर वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी जयभीमनगरमध्ये दुपारी १२ ते २ वाजेच्या सुमारास घडली.
शुभम अनिल वाघुले (२२, रा. लहुजीनगर, हर्सूल) असे मयताचे नाव आहे. विशेष म्हणजे नसा कापल्यावर संशयित आरोपीने शुभमला खोलीत कोंडून घेतले आणि पोबारा केला. याप्रकरणी शुभमचे वडील अनिल वाघुले यांच्या फिर्यादीवरून सुशील दाभाडे (रा. सिद्धार्थनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
याबाबत बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, मयत शुभम आणि संशयित आरोपी सुशील दाभाडे हे दोघे अकरावीपासून मित्र आहेत. सध्या ते शासकीय महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहेत. काही दिवसांपूर्वीच शुभम एका कंपनीत नोकरीला लागला होता. बुधवारी रात्रपाळीची ड्यूटी करून गुरुवारी सकाळी तो घरी आला होता. सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचा मित्र सुशील दाभाडे घरी आला. त्यानंतर शुभम आईला सांगून सुशीलसोबत घराबाहेर पडला. हे दोघे जयभीमनगरमध्ये सुशीलच्या बहिणीच्या घरी गेले. सुशीलची बहीण आणि भावजी दोघेही बाहेर गेलेले असल्यामुळे ते दोघे घरीच थांबले. याच खोलीत शुभमचे हात-पाय बांधून त्याच्या नसा कापण्यात आल्या. गळ्यावर, पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले, तसेच गुप्तांगही कापण्यात आले. हे अमानुष कृत्य करून आरोपींनी घराला बाहेरून कुलूप लावले आणि पोबारा केला.
सुशील दाभाडे आणि शुभम यांनी तीन दिवसांपूर्वी सोबत ‘सैराट’ सिनेमा पाहिल्याचे घाटीत जमा झालेल्या नातेवाईकांनी सांगितले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी शुभमचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निश्चय केला होता. पोलीस निरीक्षक शेख सलीम यांनी नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू झाली.
आरोपीच्या शोधार्थ पाच पथके
शेजाऱ्यांनी कुलूप तोडले तेव्हा शुभम खोलीत मदतीसाठी याचना करीत होता. सुशीलला विचारा, त्याने मला का मारले, असे तो पुटपुटत होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे बेगमपुरा पोलिसांनी सुशीलच्या कुटुंबियांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच फरार असलेल्या सुशीलचा शोध घेण्यासाठी पाच पथके पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक शेख सलीम यांनी दिली.

Web Title: Cut off the hands and feet of the nerves and kill the innocent blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.