सारोळा परिसरात "झाडे कापा- नोटा छापा" जोरात
By | Updated: December 4, 2020 04:07 IST2020-12-04T04:07:49+5:302020-12-04T04:07:49+5:30
नाचनवेल, आमदाबाद, सारोळा, जवखेडा खु., जवखेडा बु. या संपूर्ण परिसरात बेकायदा वृक्षतोडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून जागोजागी तोडून ...

सारोळा परिसरात "झाडे कापा- नोटा छापा" जोरात
नाचनवेल, आमदाबाद, सारोळा, जवखेडा खु., जवखेडा बु. या संपूर्ण परिसरात बेकायदा वृक्षतोडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून जागोजागी तोडून टाकलेल्या लाकडांचे ढीग पडलेले आहेत. अद्ययावत यंत्रसामग्री व कुशल मनुष्यबळ यांचा वापर करून अनेक दशके जुने वृक्ष अवघ्या काही मिनिटांत भुईसपाट करून हिरवाकंच परिसर माळरानात रूपांतरित केला जात आहे. ग्रामपंचायत,महसूल विभाग, वनविभाग किंवा पोलीस प्रशासन यापैकी कोणीही कारवाई करण्यात पुढाकार न घेतल्याने वृक्षतोड जोरात सुरु आहे. हे प्रकार थांबवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
फोटो कॅप्शन : कन्नड तालुक्यातील सारोळा परिसरात जागोजागी अवैधरित्या तोडलेल्या लाकडांचे ढीग.