तिन्हीही पालिका प्रशासकांच्या ताब्यात
By Admin | Updated: July 7, 2014 00:32 IST2014-07-07T00:01:17+5:302014-07-07T00:32:24+5:30
हिंगोली : राज्यातील सर्व नगर पालिकांच्या अध्यक्षांचा कालावधी ५ जुलै रोजी संपुष्टात आल्यामुळे या पालिकांवर आता प्रशासकाची नियुक्ती करावी लागणार आहे.
तिन्हीही पालिका प्रशासकांच्या ताब्यात
हिंगोली : राज्यातील सर्व नगर पालिकांच्या अध्यक्षांचा कालावधी ५ जुलै रोजी संपुष्टात आल्यामुळे या पालिकांवर आता प्रशासकाची नियुक्ती करावी लागणार आहे. रविवारी ‘लोकमत’ने दिलेले हे वृत्त तंतोतंत खरे ठरले असून जिल्ह्यातील तिन्हीही नगर पालिका प्रशासकांच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वसमत आणि हिंगोली पालिकेवर उपविभागीय अधिकारी तर कळमनुरी पालिकेवर तहसीलदारांची नेमणूक केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
राज्य मंत्रीमंडळाने विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करून मावळत्या नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. काहींनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतल्याने २ जुलैै रोजी मुदतवाढीचा निर्णय रद्द करण्यात आला. तद्नंतर ३ जुलै रोजी नगर विकास उपसचिव जे.एन. पाटील यांनी काढलेल्या अध्यादेशामुळे नगराध्यक्षांचा कालावधी ५ जुलै रोजी संपुष्टात आला. त्यामुळे नवीन नगराध्यक्षांच्या निवडीपर्यंत पालिकांवर प्रशासकाची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. रविवारी ‘लोकमत’ने दिलेले हे वृत्त खरे ठरल्याने जिल्ह्यातील पालिका आता प्रशासकांच्या ताब्यात गेल्या आहेत. सायंकाळी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी तिन्हीही नगर पालिकांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हिंगोली नगर पालिकेवर उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी यांची नियुक्ती केली जाणार आहे. दुसरीकडे वसमत येथील उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी तेथील पालिकेचे काम पाहण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे; मात्र कळमनुरी येथील पालिकेवर तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांची नेमणूक केल्याचे आदेश काढल्याचा दुजोरा सुत्रांकडून मिळाला. तिन्हीही पालिकेच्या नवीन नगराध्यक्षांची निवड होईपर्यंत प्रशासकांकडून काम पाहिल्या जाणार आहेत. आगामी १५ जुलैैपर्यंत नवीन नगराध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार आहे. त्याआधीपासूनच नगराध्यक्षांच्या पदासाठी इच्छुकांकडून फिल्डींग लाविली जात आहेत. त्यानुषंगाने मागील महिनाभरापासून काहींनी तयारी देखील केली आहेत. हिंगोली येथील नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांची संख्या मर्यादीत आहे.
दुसरीकडे कळमनुरी नगर पालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असली तरी इच्छुकांची संख्या अर्धा डझन आहे; पण येथील नगराध्यक्षपदी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने तयारी सुरू केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वसमतमध्ये निवडीत चुरशीची शक्यता
शिवसेना-भाजपची सत्ता येताच नगराध्यक्षांच्या कालावधीची वाटणी झाली होती. सत्ता वाटपानुसार दोन्ही पक्षांनी नगराध्यक्षांचा कालावधी काढला; परंतु विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्याने येथील नगराध्यक्षपदाचे महत्व वाढले आहे. वसमत विधानसभेची जागा सेना लढवित असल्याने पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी जोर धरला जात आहे; परंतु भाजपाच्या सहकार्याविना नगराध्यक्षाची नय्या पार करता येणार नसल्याने येथील निवड चुरशीची होण्याची शक्यता बांधली जात आहे. त्यातच येथील नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने सामना अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
‘लोकमत’ने दिलेले
वृत्त खरे ठरले
रविवारी ‘लोकमत’ने दिलेले हे वृत्त तंतोतंत खरे ठरले असून जिल्ह्यातील तिन्हीही नगर पालिका प्रशासकांच्या ताब्यात गेल्या आहेत.
हिंगोली पालिकेवर उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी तर वसमत येथे उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी तेथील पालिकेचे काम येण्याची शक्यता आहे.
मात्र कळमनुरी पालिकेवर तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांची नेमणूक केल्याचे आदेश काढल्याचा दुजोरा सुत्रांकडून मिळाला. नवीन नगराध्यक्षांची निवड होईपर्यंत हा बदल आहे.
राज्यातील सर्व नगर पालिकांच्या अध्यक्षांचा कालावधी ५ जुलै रोजी संपुष्टात आल्यामुळे या पालिकांवर आता प्रशासकाची नियुक्ती करावी लागणार आहे. हिंगोली जिल्ह्यात कार्यवाही सुरू झाली आहे.