शेणखताचा वापराने सीताफळाची फुलली बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:40+5:302020-12-17T04:32:40+5:30
सोयगाव : पारंपरिक शेतीला बगल देत सोयगावचे युवा शेतकरी अरुण सोहनी यांनी सेंद्रीय शेतीचा अनोखा प्रयोग केला. सातत्य परिश्रमाच्या ...

शेणखताचा वापराने सीताफळाची फुलली बाग
सोयगाव : पारंपरिक शेतीला बगल देत सोयगावचे युवा शेतकरी अरुण सोहनी यांनी सेंद्रीय शेतीचा अनोखा प्रयोग केला. सातत्य परिश्रमाच्या जोरावर शेणखताचा भरगच्च वापर करून सीताफळ बाग फुलवून विक्रमी उत्पादन घेतले. या प्रयोगाने सोहनी यांची चांगलीच चर्चा तालूक्यात होऊ लागली आहे.
सोयगाव येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी अरून सोहनी यांनी सीताफळाची बाग मोठ्या मेहनतीने फुलविली आहे. पारंपारिक पद्धतीची शेतीतून लागवडीसाठी लावलेला खर्च देखील निघत नाही. दरवर्षी हाती काहीच उरत नसल्याचे विदारक चित्र डोळ्यासमोर दिसत होते. त्यामुळे अरूण यांनी शेतात सीताफळाची लागवड केली. त्यासाठी प्रामुख्याने रासायनिक खतांचा वापर न करता शेणखताचा अनोखा प्रयोग उपयुक्त ठरला आहे. त्यातून विक्रमी उत्पन्न घेऊन लाखो रूपयांची कमाई केली आहे.
सोहनी यांनी सर्वात प्रथम तीन हजार रुपये प्रती ट्रॉली प्रमाणे शेणखत खरेदी केले. शेतात लावलेल्या प्रत्येक झाडाला चार टोपली याप्रमाणे शेणखत दिले. पुन्हा मे महिण्यामध्ये प्रत्येकी सीताफळांच्या झाडाच्या तळाला चार टोपली गाळ व शेणखत दिले. तर तणनाशक फवारणी केली. त्याचा परिणाम हा सीताफळाच्या उत्पन्नात झालेल्या दुप्पट वाढीत दिसून आला.
-------
शेणखत टाकाल्यामुळे कोणताही दुष्परिणाम यंदा जाणवला नाही. झाडांवर कोणताही प्रादुर्भाव आढळून आला नाही. त्यामुळे विक्रमी उत्पन्न हाती आले. सीताफळ बागेत घेतलेले आंतर पीकातूनही उत्पन्न मिळाले आहे. शेणखताच्या वापरामुळे सिताफळात गोडवा आणि दर्जा खूप चांगला आहे.- अरूण सोहनी, युवा शेतकरी.
-----
सोयगाव तालुक्यात सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांचा मोठा ओढा वाढू लागला आहे. परिणामी विषमुक्त भाजीपाल्याला बाजारात किंमत आली आहे. शेणखतामुळे उत्पादनात देखील वाढ होऊ लागली आहे. - संगीता पवार. तालूका कृषी अधिकारी, सोयगाव.
-------
शेणखतासाठी मेंढ्या बसविल्या
शेणखताच्या उपलब्धतेसाठी शेतकरी अरुण सोहनी यांनी शेतात मेंढ्यांचे कळप बसविले. त्यामुळे जमिनीचा पत वाढण्यास मोठा फायदा झाला. जवळपास आठ दिवस मेंढ्या शेतात बसलेल्या होत्या. असेही युवा शेतकरी सोहनी यांनी सांगीतले.
-----
छायाचित्र ओळी - सेंद्रिय शेतीतून सीताफळाचे विक्रमी उत्पन्न घेतलेले शेतकरी अरुण सोहनी.