शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

करडी तेल भडकले; डाळी कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:05 IST

देशात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढला असताना दुसरीकडे बाजारपेठेत महागाईने डोके वर काढले आहे. करडी तेलाच्या भावाने तर आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. तर डाळींमध्येही हळूहळू वाढ होत असून, १०० रुपयांच्या जवळ पोहोचण्यास त्यांची चढाओढ सुरू झाली आहे. यात सर्वसामान्य ग्राहक होरपळत आहे.

ठळक मुद्देमहागाई : जीवनावश्यक वस्तूंमध्ये भाववाढ उच्चांकाकडे

औरंगाबाद : देशात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढला असताना दुसरीकडे बाजारपेठेत महागाईने डोके वर काढले आहे. करडी तेलाच्या भावाने तर आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. तर डाळींमध्येही हळूहळू वाढ होत असून, १०० रुपयांच्या जवळ पोहोचण्यास त्यांची चढाओढ सुरू झाली आहे. यात सर्वसामान्य ग्राहक होरपळत आहे.दुष्काळाची तीव्रता आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर दिसून येऊ लागली आहे. कमी पावसामुळे मागील हंगामात करडीच्या उत्पादनाला फटका बसला होता. जालना, लातूर, सोलापूर, अकोला या भागांतून शहरात करडी तेलाची आवक होते. करडीच्या उत्पादनाची अद्ययावत आकडेवारी कृषी विभागाकडेही नसल्याने करडीचे उत्पादन किती घटले याचा अंदाज कोणालाही आला नाही. मात्र, नवीन करडीचा हंगाम सुरू होऊन चार महिने होत आले, पण अजूनही करडी तेलाची आवक वाढली नसल्याने आता त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. जगन्नाथ बसैये यांनी सांगितले की, कमी पावसाचा फटका मागील वर्षी करडीच्या उत्पादनाला बसला आहे. परिणामी करडीची आवक कमालीची घटली आहे. करडीचे तेल फेब्रुवारीत वसंत पंचमीला १४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले होते. यात चार महिन्यांत दीड हजार रुपये भाववाढ होऊन आजघडीला १६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहे. पहिल्यांदा क्विंटलमागे दीड हजार रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील आठवड्यात लिटरमागे १० रुपयांनी करडी तेल महागले असून, रविवारी १५५ ते १६० रुपये प्रतिलिटर विक्री झाले. पहिल्यांदाच करडी तेलाच्या भावाने लिटरमागे १५० रुपयांचा आकडा पार केला आहे. करडी बीचे भाव ३५०० हून थेट ४६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले आहे. आता नवीन करडी येण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. आवक कमी राहिली तर येत्या काळात करडी तेल मिळणेही कठीण जाईल. करडी तेलाच्या भावाने आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. यापूर्वी १३० रुपयांपर्यंत करडी तेल विक्री झालेले आहे. करडी महागताच शेंगदाणा तेलाचेही भाव वाढले आहेत. लिटरमागे ५ रुपयांनी भाववाढ होऊन १०५ ते ११० रुपये प्रतिलिटरने शेंगदाणा तेल विक्री होत आहे. बाकीच्या खाद्यतेलांचे दर स्थिर आहेत.डाळी वधारल्यामागील महिनाभरात डाळींचे भावही किलोमागे ८ ते १० रुपयांनी वधारले आहेत. महिनाभरापूर्वी ७२ ते ७६ रुपये विक्री होणारी मूग डाळ बुधवारी ८४ ते ९० रुपये किलोने विक्री झाली. तसेच मठ डाळ ८८ ते ९० रुपये, तूर डाळ ८२ ते ८६ रुपये, उडीद डाळ ६८ ते ७० रुपये तर हरभरा डाळ ६० ते ६४ रुपये प्रतिकिलोने विकत आहे. मागील हंगामात पाऊस कमी पडल्याने मूग, उडदाचा पेरा कमी झाला होता. तसेच पाणी कमी असल्याने रबी हंगामात हरभऱ्याचाही पेरा कमी झाला होता. पुढील महिन्यात पाऊस समाधानकारक पडला तरच मूग व उडदाची पेरणी होऊ शकते. त्यावरच पुढील तेजी-मंदी अवलंबून राहील.चौकटशेंगदाणा शंभरीजवळशेंगदाणा उत्पादक कर्नाटक व गुजरात राज्यात यंदा उत्पादन कमी झाले आहे. तसेच महाराष्ट्रातही उन्हाळी पीक कमीच आहे. परिणामी, शेंगदाणा महिनाभरात किलोमागे १० रुपयांनी वधारला आहे. मोंढ्यात किरकोळ विक्रीत एप्रिल महिन्यात ८० ते ८४ रुपये किलो मिळणारा शेंगदाणा बुधवारी ८४ ते ९४ रुपये प्रतिकिलो विकल्या जात होता. मॉलमध्ये तर ११० रुपये किलोने शेंगदाणा विकल्या जात आहे. नवीन शेंगदाणा सप्टेंबर महिन्यात येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गुजरात तर दुसºया पंधरवड्यात कर्नाटक राज्यातून शेंगदाण्याची आवक होईल. तोपर्यंत शेंगदाण्याचे भाव किती वाढतील, हे सांगणे सध्या कठीण आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार