रेल्वे प्रवासात अर्थसंकल्पाची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:01+5:302021-02-05T04:22:01+5:30
--- बसस्थानकात प्रवाशांत चर्चा अर्थसंकल्प सादर होताना मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकात अनेक प्रवासी काय स्वस्त झाले, अर्थसंकल्पात काय ...

रेल्वे प्रवासात अर्थसंकल्पाची उत्सुकता
---
बसस्थानकात प्रवाशांत चर्चा
अर्थसंकल्प सादर होताना मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकात अनेक प्रवासी काय स्वस्त झाले, अर्थसंकल्पात काय मिळाले, यावर चर्चा करीत होते. प्रवासी सेवेच्या दृष्टीने काही बदल व्हावा, चांगली सुविधा मिळावी, प्रवासाचे दर कमी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. एसटी चालक-वाहकही अधूनमधून मोबाइलवरून माहिती घेत अर्थसंकल्पाविषयी मत व्यक्त करीत होते.
----
चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्याची आशा
अर्थसंकल्पात मोठी तरतूद केल्याचे दिसते. पण राज्याला काय मिळाले, हे लक्षात आले नाही. त्यातही सर्वसामान्य नागरिकांना काय मिळाले, असा प्रश्न पडला आहे. ज्येष्ठ नागरिकांना कर भरण्याच्या कटकटीपासून मुक्तता मिळाली आहे, हे थोडे दिलासादायक वाटते. आरोग्याचे बजेट वाढले. त्यामुळे किमान यापुढे तरी सर्वसामान्यांना सरकारी रुग्णालयांत चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील, अशी आशा आहे.
- अभिनव पिंपळे, नागरिक