वडगावात चुलत दीर-भावजायची आत्महत्या
By Admin | Updated: October 8, 2014 00:48 IST2014-10-08T00:29:16+5:302014-10-08T00:48:52+5:30
मंठा : तालुक्यातील ठेंगेवडगाव शिवारातील शेतीवर असलेल्या खोलीत चुलत दीर-भावजयने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवार ७ आॅक्टोबर रोजी पहाटे

वडगावात चुलत दीर-भावजायची आत्महत्या
मंठा : तालुक्यातील ठेंगेवडगाव शिवारातील शेतीवर असलेल्या खोलीत चुलत दीर-भावजयने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवार ७ आॅक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आला.
ठेंगेवडगाव येथील ईश्वर पांडूरंग खरात (३५) व चुलत भावजायी संगीता मधुकर खरात (३२) या दोघांनी बाबासाहेब मुंजाजी खरात यांच्या शेतवस्तीवरील खालीत गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी मंठा येथील सुभाष भगवान बोराडे यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकाराने ठेंगेवडगाव आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून चर्चेलाही उधाण आले आहे. अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. पोलिसांकडून सदर प्रकरणात काहीच तपास करण्यात आला नाही. त्यामुळे शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. ईश्वर खरात हे एस.पी.एच. होम प्रॉडक्ट अॅण्ड मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचे संचालक सुरेश खरात यांचे धाकटे बंधू आहेत. मंठा ठाण्याचे उपनिरीक्षक चंपालाल चरभरे यांनी सांगितले, आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनीही रात्री दीड वाजता कल्पनाच्या मोबाईलवरून एसएमएसद्वारे कुटूंबियांना दिली होती. यात कोणालाही त्रास दिला जाऊ नये, असे कळविले होते. शिवाय वैद्यकीय अधिकारी यांनीही सदर प्रकरणात घातपाताचा प्रकार दिसून येत नसल्याचे सांगितले, असा दावा चरभरे यांनी केला. (वार्ताहर)