घनसावंगीत अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:34 IST2017-08-19T00:34:58+5:302017-08-19T00:34:58+5:30
मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पोलीस बंदोबस्तात हटविले.

घनसावंगीत अतिक्रमण हटाव मोहीम
घनसावंगी : येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पोलीस बंदोबस्तात हटविले.
बांधकाम विभागाने हाती घेतलेल्या या मोहिमेत येथील मुख्य रस्त्याच्या मध्यभागासून ५० फुटापर्यंत अतिक्रमण हटविण्यात येत आहे. पक्के बांधकाम असलेल्या व्यापारी संकुलांसमोर अनेकांनी उभारलेले पत्र्याचे शेड मोहिमेदरम्यान पाडण्यात आले. काहींनी स्वत:हून आपल्या टपºया हटविल्या. हातगाड्यांवर व्यवसाय करणाºयांची मात्र या मोहिमेमुळे धांदल उडाली. अंबड-पाथरी हा रस्ते संपूर्णत: अतिक्रमणमुक्त करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या मोहिमेत पोलिस निरीक्षक संजय लव्हकरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी. बी. खोसे, निवारे आदी सहभागी झाले होते.