‘सीटीस्कॅन’ अद्याप बंदच

By Admin | Updated: November 26, 2014 01:08 IST2014-11-26T00:44:26+5:302014-11-26T01:08:57+5:30

उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयातील ‘सीटीस्कॅन’ मशीनला लागलेले तांत्रिक बिघाडाचे ग्रहण कायम आहे़ नादुरूस्त मशीनमुळे मात्र, रूग्णांची हेळसांड कायम आहे़

'CTCAN' is still blocked | ‘सीटीस्कॅन’ अद्याप बंदच

‘सीटीस्कॅन’ अद्याप बंदच


उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयातील ‘सीटीस्कॅन’ मशीनला लागलेले तांत्रिक बिघाडाचे ग्रहण कायम आहे़ नादुरूस्त मशीनमुळे मात्र, रूग्णांची हेळसांड कायम आहे़
रूग्णालयात दररोज उपचारासाठी ११०० ते १२०० रूग्ण बाह्य रूग्ण विभागात येतात़ तर उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णांची संख्याही तशीच मोठी आहे़ शिवाय अपघातासह इतर ठिकाणाहून येणारे अपघातासह इतर आजारातील गंभीर रूग्णांवरही येथे उपचार करण्यात येतात़ मात्र, जिल्हा रूग्णांसाठी महत्त्वपूर्ण असलेली ‘सीटीस्कॅन’ मशीन अद्यापही बंद आहे़ आघाडी शासनाच्या काळातील निर्णयानुसार उमरगा उपजिल्हा रूग्णालयात मशीन हलविण्यास विरोध झाला आहे़ विशेष म्हणजे ही मशीन हलविण्याच्या प्रकियेसाठी जिल्हा रूग्णालयाकडून संबंधित कंपनीकडे लाखो रूपये वर्ग करण्यात आले आहेत़ त्यापूर्वीच ही मशीन बंद पडली होती़ मशीनमधील तांत्रिक बिघाडाची अभियंत्यांनी पाहणी केली असून, जवळपास १७ लाख रूपये खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे़ बंद पडलेली यंत्रणा दुरूस्त न केल्याने रूग्णांचे हाल होत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: 'CTCAN' is still blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.